मुंबई : सध्या सोशल मीडियावर काही डान्सचे व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. यात काही पोलिसांचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांनी केलेला डान्स अनेकांच्या पसंतीला उतरताना दिसतो. सध्या असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक ट्रॅफिक पोलीस (Police Dance Video) भररस्त्यात डान्स करताना पाहायला मिळत आहे. या पोलिसाच्या समोर आणखी एक माणूस नाचताना दिसत आहे. हे दोघे मै तेरा तू मेरी, झुमे सारा हिंदुस्तान या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. या दोघांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी केलेला डान्स अनेकांच्या पसंतीला उतरताना दिसतो. सध्या असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक ट्रॅफिक पोलीस भररस्त्यात डान्स करताना पाहायला मिळत आहे. या पोलीसाच्या समोर आणखी एक माणूस नाचताना दिसत आहे. या दोघांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे मै तेरा तू मेरी, झुमे सारा हिंदुस्तान या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा डान्स सध्या अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
ऐसे पल #PublicPoliceFriendship के खूबसूरत उदहारण हैं! #DancingCop #DancingWithCop. pic.twitter.com/8Y11Nf5sOO
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 25, 2022
हा व्हीडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी या व्हीडिओला “हा व्हीडिओ सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांची मैत्री दर्शवतो”, असं कॅप्शन दिलं आहे. हे गाणं अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्या ‘शान’ चित्रपटातील आहे. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हीडिओला 25 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर शेकडो नेटकऱ्यांनी याला रिट्विट करत कमेंट केली आहे. “जय हिंद!” असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो “हा व्हीडिओ पाहून इतरांनाही प्रेरणा मिळेल.”