सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात.आता हत्तींच्या कळपाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हत्तींचा कळप एका लहान पिलाला आपल्या संरक्षणात घेत चालताना दिसत आहे. हे पाहून असे वाटते की, हत्ती पिलाला Z प्लस संरक्षण देण्यात आलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा ताण पळून जाईल (Viral Video shows herd of elephants escorting little cutie IFS Says it made my day)
हत्तीचा हा गोंडस व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हत्तींचा कळप मुलाला झेड प्लस सिक्युरिटीमध्ये कसं घेऊन जात आहे ते पाहा. या व्हिडिओने माझा दिवस बनवला आहे. काही तासांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला आताच 7 हजारांपेक्षा जास्त वेळा लोकांनी पाहिला गेला आहे.
व्हिडीओ पाहा:
Look how the cutie is being escorted with Z+++ security.
Made my day.
Shared by @surenmehra pic.twitter.com/OWUVJoV5ms— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 12, 2021
हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. याला 1200 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत आपल्या कमेंट्स देत आहेत. कुणी कमेंटमध्ये गोंडस आहे, तर कोणी छोटू गणेश म्हणत आहे.
व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले, ‘सर्व पालकांप्रमाणे ‘ एकत्र चाला, कुणीही इकडे -तिकडे धावणार नाही’ हा नियम लागू करण्यात आला आहे. दुसऱ्याने लिहिले, ‘हा खूप गोंडस आहे, या व्हिडिओने माझा दिवस बनवला.’ त्यावेळी काहींनी इमोजीज वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हा व्हिडिओ IFS सुरेंद्र मेहरा यांनी शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी आयएफएस नंदालाही टॅग केले आहे. व्हिडिओ शेअर करताना IFS मेहराने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘खरं तर हत्ती हे प्राण्यांपैकी सर्वात सभ्य आहेत. ते कोणत्याही प्रकारच्या संघर्षात अडकत नाहीत. परंतु जर तुम्हाला हत्तींचा सामना झाला तर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. विशेषत: जेव्हा त्यांच्या कळपात पिलं असतात.
व्हिडिओमध्ये हत्तींचा कळप एका लहान पिलाला आपल्या संरक्षणात घेत चालताना दिसत आहे. हे पाहून असे वाटते की, हत्ती पिलाला Z प्लस संरक्षण देण्यात आलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा ताण पळून जाईल
हेही पाहा: