सोशल मीडियाच्या जगात अनेक मजेदार व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या ट्विटरवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खारुताई आणि साप यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. पण या लढ्याचा निकाल अतिशय धक्कादायक आहे. ( Viral video Squirrel fight with snake result will leave you shocked )
तसं, साप पाहून अनेकांची हवा टाईट होते. माणसांना काय, प्राण्यांनाही सापांची इतकी भीती वाटते की, ते साप बघितल्यावर त्यांचा मार्गही बदलतात. पण साप आणि खारुताईचा असा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
तर आधी हा व्हिडीओ पाहू.
If you had not seen a squirrel devouring a snake gleefully, look at this…
?Life & Nature pic.twitter.com/LWIdiYFcbC— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 6, 2021
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये लहान खारुताई सापाशी लढताना दिसत आहे. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की, कदाचित सापाने खारुताईशी पंगा घेऊन चूक केली आहे. खारुताई या सापाचा सामना करताना दिसते आहे. त्यातच असं काही घडतं की, जे पाहून कोणीही तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या लढाईत खारुताई वारंवार सापाच्या तोंडांवर तिच्या पंजाने ओरखडे मारते. यानंतर ती सापाला पकडते आणि त्याचा थेट जबडाच कुरतडायला लागते.
अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, जर तुम्ही कोणत्याही खारुताईला साप गिळताना पाहिले नसेल, तर ते आता बघा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण खारुताईच्या धाडसाचे कौतुक करत आहे.
अनेक नेटकरी म्हणत आहे की, त्यांना कधी वाटलं नव्हतं की खारुताई ही मांसाहारी असू शकते. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, मला नेहमी वाटायचं की खारुताई शाकाहारी आहेत. तिने या विषारी सापाला कसं खाल्लं? त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले की, माझा यावर विश्वास बसत नाही.
हेही पाहा: