प्राण्यांवर प्रेम फक्त दाखवू नये, तर त्यांची काळजीही घेतली पाहिजे. याचं कारण असे की, त्यांना बोलता येत नाही आणि त्यांच्या समस्या सांगता येत नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये लोक प्राण्यांना त्रास देत असल्याचे पाहायला मिळते. आपला जीव वाचवण्यासाठी ते माणसांपासून दूर राहणंच पसंत करतात. जिराफ हा एक उंच प्राणी आहे, ज्याची मान खूप लांब आहे. हा फक्त आफ्रिकेच्या जंगलातच दिसतो. काहीवेळा तो जंगलाच्या आसपासच्या ग्रामीण भागात देखील दिसून येतो. जिराफ कधीच माणसांवर हल्ला करत नाही. (viral video the forest staff removed the tire from the giraffe’s neck)
प्राण्यांना त्रास होत असेल तर समस्येबद्दल बोलू शकत नाही. त्यांना समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, जिराफाच्या गळ्यात टायर अडकला आहे. मात्र, टायर त्यांच्या डोक्यात कसा गेला हे कळू शकले नाही. वर्षभर हा जिराफ गळ्यात घेऊन फिरत होता. त्यालाही वेदनाही होत होत्या, हे कळाल्यानंतर वनजीव बचाव पथक जिराफाच्या गळ्यातील टायर काढण्यासाठी तयार झाले. त्यानंतर टीमसह जंगलात पोहोचले आणि नंतर जिराफाला पकडून प्रथम भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले.
पाहा व्हिडीओ:
#Tyre around #Giraffe neck for a year??
Removed…..???
काश इंसान इंसानों के लिए भी ऐसा करता☺️?@ParveenKaswan @susantananda3 @haverkamp_wiebe @Defenders @World_Wildlife pic.twitter.com/t0beS8U2W5— Rupin Sharma IPS (@rupin1992) October 25, 2021
जिराफाच्या गळ्यातील टायर काढल्यानंतर त्याच्या मानेभोवतीच्या जखमांवर मलम लावला. जिराफ शुद्धीवर येताच, तो उभा राहिला आणि मग जंगलाच्या दिशेने पळू लागला. जंगलाकडे पळताना त्याला आधीपेक्षा खूप मोकळं वाटत होतं. यातून सुटका करण्यासाठी बचाव पथकाने अवलंबलेल्या युक्तीचे लोकांनी कौतुक केले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक होऊ झालेले दिसले.
जिराफचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (Rupin Sharma) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘गेल्या एक वर्षापासून जिराफाच्या मानेवर टायर अडकला होता. आता तो टायर काढून टाकण्यात आला आहे,’ हा व्हिडिओ 800 हून अधिक लोकांनी लाइक केला आहे, तर 12 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.
हेही पाहा: