मुंबई : मैत्री… दोस्ती… यारी… तीन वेगवेगळे पण त्याचा अर्थ एकच… विश्वास अन् प्रेम… हे नातंच वेगळं असतं. रक्ताचं नात नसताही आपले मित्र-मैत्रिणी (Friends) अनेक वेळा आपल्यासोबत खंबीर उभं असल्याचं पाहायला मिळतं. अश्या दोस्ती, यारीवर अनेक चित्रपटही बनले आहेत. अगदी शोले (Shole) चित्रपटातील जय-वीरूच्या दोस्तीचं अनेकदा उदाहरण दिलं जातं. मराठीतील दुनियादारी (Duniyadari) या सिनेमाने तर सगळ्यांनाच खऱ्या मैत्रीचा अर्थ समजावला. असाच मैत्रीच्या दुनियेतील’राजा व्हीडिओ’ सध्या व्हायरल होत आहे. यात तिघा मित्रांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. यात दोन मैत्रिणी आणि त्यांचा एक मित्र दिसत आहे. यातला मुलगा हा अपंग आहे. त्यामुळे या दोघी त्याला उचलून घेतात आणि चालायला लागतात.
सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात तिघा मित्रांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. यात दोन मैत्रिणी आणि त्यांचा एक मित्र दिसत आहे. यातला मुलगा हा अपंग आहे. त्यामुळे या दोघी त्याला उचलून घेतात आणि चालायला लागतात. हा व्हीडीओ केरळमधील आहे. या व्हायरल व्हीडीओमधील तरुणाचं नाव अलिफ मोहम्मद असं आहे. या व्हिडीओमध्ये अलिफला त्याच्या दोन मैत्रिणी उचलून घेऊन चालायला लागतात. हा व्हिडीओ केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील सस्थमकोट्टा येथील डीबी कॉलेजच्या कॅम्पसमधील आहे.
At this time when there is unrest in the country due to communal hatred, this heart warming video will make your day.
A specially abled #Muslim guy #Alif being carried by his college friends #Arya & #Archana who are #Hindus.#Kerala #Kollam #Sasthamcotta #DBcollege #Friendship pic.twitter.com/i5A7p2s0fZ
— Hate Detector ? (@HateDetectors) April 8, 2022
केरळमधील हा तरूण अलिफ मोहम्मद जन्मत:च दिव्यांग आहे. अलिफला जन्मापासूनच पाय नाहीत. पण त्याच्याकडे त्याचे मित्र-मैत्रिणी आहेत. जे त्याला नेहमी आधार देतात. त्याचा दोन मैत्रिणी त्याला असंच कॉलेजमध्ये खांद्यावर सोबत घेऊन फिरतात. अलिफ बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे.
व्हायरल व्हीडिओविषयी अलिफने सांगितलं की, “या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन तरुणी माझ्या मैत्रिणी आहेत. त्या नेहमी मला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरण्यास मदत करतात. माझे मित्रमैत्रिणी मला कॅम्पसमध्ये खांद्यावर घेऊन फिरवतात. एकीकडे काही लोक धर्माच्या नावावर समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे हा व्हिडीओ सर्व जाती, धर्माच्या पलिकडील भावना आणि प्रेमाची बरसात करत आहे.”
संबंधित बातम्या