मुंबई : आजकाल सगळेचजण मोबाईल (Mobile) फोनला खूप जास्त अॅडिक्ट झाले आहेत. फोन शिवाय अनेकांना करमत नाही. पण जीवनामरणाचा प्रश्न असेल तरीही जर फोन हातातून सुटत नसेल तर हे अॅडिक्शन गंभीर आहे. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा (Deepanshu Kabara) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक रेल्वे निघू जाते. त्यावेळी त्याच्या खाली एक मुलगी रेल्वे रुळावर आडवी पडलेली दिसते. तिच्यावरून चक्क ट्रेन जाताना दिसतेय. काही सेकंदांनंतर जेव्हा ट्रेन निघून जाते तेव्हा एक मुलगी रुळावर पडून फोनवर बोलताना दिसते. ति घाबरलेली वगैरे दिसत नाही तर ती पुढेही फोनवर बोलतच राहते. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. याला त्यांनी “फोनवर बोलणं जास्त गरजेचं आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये एक रेल्वे निघू जाते. त्यावेळी त्याच्या खाली एक मुलगी रेल्वे रुळावर आडवी पडलेली दिसते. तिच्यावरून चक्क ट्रेन जाताना दिसतेय. काही सेकंदांनंतर जेव्हा ट्रेन निघून जाते तेव्हा एक मुलगी रुळावर पडून फोनवर बोलताना दिसते. ति घाबरलेली वगैरे दिसत नाही तर ती पुढेही फोनवर बोलतच राहते. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फ़ोन पर gossip, ज़्यादा ज़रूरी है ??♂️ pic.twitter.com/H4ejmzyVak
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 12, 2022
ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा 21 सेकंदाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत 94 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला तीन हजार लोकांनी लाईकही केला आहे.
तरुणीच्या निष्काळजीपणावर नेटकऱ्यांनी ताशेरे ओढलेत. अनेकांनी आश्चर्याचे इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर असा निष्काळजीपणा करू नका, असंही अनेकांनी म्हटलंय. दरम्यान, हा व्हीडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
संबंधित बातम्या