विद्यार्थ्यांना नाचताना पाहून शिक्षिका झाल्या आऊट ऑफ कंट्रोल; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jan 23, 2023 | 11:55 AM

सोशल मीडियावर शाळेतील कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन शिक्षिका विद्यार्थ्यांना डान्स करताना पाहून आऊट ऑफ कंट्रोल आणि ठेका धरतात

विद्यार्थ्यांना नाचताना पाहून शिक्षिका झाल्या आऊट ऑफ कंट्रोल; व्हिडीओ व्हायरल
विद्यार्थ्यांना नाचताना पाहून शिक्षिका झाल्या आऊट ऑफ कंट्रोल; व्हिडीओ व्हायरल
Follow us on

Dance Viral Video : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. एवढंच नाही तर, कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा अंदाज देखील आपण लावू शकत नाही. अशात सोशल मीडियावर व्हायरल होणारे हजारो व्हिडीओ युजर्सचं लक्ष वेधतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असं अनेक व्हिडीओ असतात जे पाहून हसू आवरत नाही. याच कारणामुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क शिक्षिका आऊट ऑफ कंट्रोल होताना दिसत आहेत.

आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाळेतल्या एका कार्यक्रमात विद्यार्थी स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना डान्स करताना पाहून शिक्षिका देखील आऊट ऑफ कंट्रोल होतात आणि भन्नाट डान्स करु लागतात.

विद्यार्थ्यांसोबत दोन शिक्षिकांनी ठरलेला ठेका सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचा डान्स युजर्सना प्रचंड आवडत आहे. सध्या सर्वत्र या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

 

 

व्हिडीओमध्ये दोन शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत ठेका धरताना दिसत आहेत. पंजाबी गाण्यावर दोन्ही शिक्षिका डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा डान्सपाहून एक शिक्षिका स्टेजखाली डान्स करायला सुरुवात करते, त्यानंतर दुसरी शिक्षिका येते आणि ती देखील पंजाबी गाण्यावर ताल धरते.

विद्यार्थी आणि दोन शिक्षिकांचा व्हिडीओ पाहून कार्यक्रमाला जमलेले सर्व कडकडून टाळ्या वाजवू लागतात. सध्या विद्यार्थ्यांसोबत दोन महिला शिक्षकांनी धरलेला ठेका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दोन महिला शिक्षकांचे डान्स स्टेप युजर्सना प्रचंड आवडत आहेत.

विद्यार्थी आणि दोन शिक्षिकांच्या व्हिडीओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. सध्या सर्वत्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर देखील केला आहे.