कराची : 25 नोव्हेंबर 2023 | पाकिस्तानच्या कराचीमधील युकेच्या व्हिसा ऑफिसमध्ये अत्यंत धक्कादायक घडना घडली. या ऑफिसमध्ये सर्वसामान्यांना पाहण्यासाठी लावण्यात आलेल्या टीव्ही स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाला. हे पाहून सर्वजण चकीत झाले. याच घटनेचा व्हिडीओ काहींनी मोबाइलमध्ये शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्याने जेव्हा टीव्हीवर अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याचं पाहिलं, तेव्हा त्याने ताबडतोब टीव्ही बंद केला.
एक्सवर (ट्विटर) एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कराचीमधील युकेच्या व्हिसा ऑफिसमध्ये चुकून टीव्हीवर पॉर्न फिल्म सुरू झाली’, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. व्हिसाच्या ऑफिसमध्ये लोक आपापली कागदपत्रं घेऊन रांगेत उभे असतात. तेव्हा अचानक टीव्हीवर अश्लील व्हिडीओ सुरू होतो. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की महिला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसहीत बऱ्याच लोकांसमोर हा अश्लील व्हिडीओ बराच वेळ चालू असतो. यावेळी लाजेखातर काहीजणांनी मान खाली घातली. अखेर सुरक्षा कर्मचाऱ्याने तो टीव्ही बंद केला. आता या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
this is #Pakistan 🥵
UK visa office in Karachi 🤭😵
m!stakenly displaying love jihad in Large screen😂🤣
really #BadManners 😂😂#BlackFriday #pneumonia #Orry #PrakashRaj #pneumonia #MumbaiAirport #IrelandisFull #RinkuSingh #80sBuildup #Sensex #T20WorldCup pic.twitter.com/hYaFCHn7sC— Kreatly (@kreatlylingdoh1) November 24, 2023
अशा प्रकारची घटना घडल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याच वर्षी मार्च महिन्यात बिहारची राजधानी असलेल्या पाटणाच्या रेल्वे स्टेशनवर अचानक अडल्ट फिल्म सुरू झाला होता. रेल्वेच्या वेळापत्रकाबद्दल घोषणा होण्याऐवजी टीव्ही स्क्रीनवर अचानवर अडल्ट फिल्म सुरू झाली. प्लॅटफॉर्म नंबर 10 वर सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी होती. पाटणा रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. त्यामुळे या स्थानकात देशभरातील एक्सप्रेस येत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकात नेहमीच गर्दी आणि वर्दळ असते. सकाळी तर ही गर्दी असतेच असते. प्लॅटफॉर्मवर लावलेल्या टीव्हीवर अचानक ब्ल्यू फिल्म सुरू झाली. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या प्रकाराने लोक भांबावले. काहींनी मान दुसरीकडे वळली. तर काहींनी मान खाली घातली. काहींनी गमछाने तोंड झाकले तर काही प्रवाशांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरून काढता पाय घेतला.