मोहात पाडणारं सौंदर्य! स्त्री चं नाही, Octopus चं! पैज लावा, नाही दिवस छान गेला हा व्हिडीओ पाहून तर…

| Updated on: Oct 18, 2022 | 12:03 PM

सुंदरतेच्या व्याख्या कितीही असो, एक सुंदरता अशी असते जिच्याकडे कुणीच दुर्लक्ष करू शकत नाही. या ऑक्टोपसची सुंदरता अशीच काहीशी आहे.

मोहात पाडणारं सौंदर्य! स्त्री चं नाही, Octopus चं! पैज लावा, नाही दिवस छान गेला हा व्हिडीओ पाहून तर...
Vitreledonella richardi transperant octopus
Image Credit source: Social Media
Follow us on

पैज लावा पैज, नाही हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा दिवस चांगला गेला तर! होय. हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की तुम्ही शब्दात याची सुंदरता व्यक्त करू शकत नाही. निसर्ग ही फार सुंदर आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. या व्हिडीओ मध्ये ऑक्टोपस आहे. आता तुम्ही म्हणाल ऑक्टोपसचं काय? तो तर आम्ही खूपदा पाहिलाय. नाही! हा वेगळा आहे. हा इतका सुंदर ऑक्टोपस आहे की तुम्ही कधीच पाहिला नसणार. सुंदरतेच्या व्याख्या कितीही असो, एक सुंदरता अशी असते जिच्याकडे कुणीच दुर्लक्ष करू शकत नाही. या ऑक्टोपसची सुंदरता अशीच काहीशी आहे. बघणार?

समुद्र एक रहस्य आहे! समुद्रात खोलवर काय आणि किती सुंदरता दडून बसलीये याची कल्पना कुणालाच नाही. शोध अनेक लावले गेलेत पण शोधला अंत नसतो. सतत नवे नवे शोध लागत असतात. आता हा ऑक्टोपस बघा हे काहीतरी वेगळं आहे. समुद्राच्या रहस्याचं उत्तम उदाहरण आहे.

व्हायरल क्लिपमध्ये हा ऑक्टोपस अगदी काचेसारखा पारदर्शक दिसतो. रिपोर्ट्सनुसार, प्रशांत महासागराच्या दुर्गम भागात हा ऑक्टोपस तरंगताना दिसलाय.

व्हायरल क्लिपमध्ये दिसणारा जीव हा जेलीफिश नसून ऑक्टोपस आहे. हा ऑक्टोपस पूर्णपणे पारदर्शक आहे. या सजीवाच्या शरीरातील आतील अवयवांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो.

व्हायरल व्हिडीओमध्ये ऑक्टोपसचे डोळे, डोळ्यांच्या नसा आणि फूड पाईप अगदी स्पष्टपणे दिसतायत. त्याचबरोबर बाकीचे अवयव निळ्या काचेसारखे पारदर्शक दिसतात.

या सुंदर प्राण्याचा व्हिडिओ एका रोबोटच्या मदतीने काढला गेलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे.

ट्विटरवर @TheOxygenProj नावाच्या हँडलने हा व्हिडीओ शेअर केलाय. युझरने लिहिले, “हा एक ग्लास ऑक्टोपस (व्हिट्रेलेडोनेला रिचर्डी) आहे, जो जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय पाण्यात आढळणारा एक अतिशय अनोखा जीव आहे.”

खोल समुद्रात काचेचे ऑक्टोपस आढळतात, जिथे सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही. हा ऑक्टोपस प्रशांत महासागरातील फिनिक्स बेटांजवळ तरंगताना दिसतो.