मुंबई: ऑनलाइन व्हिडिओ मध्ये सगळ्यात लोकप्रिय म्हणजे व्लॉगिंग. ऑनलाइन प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याचा उत्तम मार्ग शॉर्ट व्हिडिओ तयार करणे यात मग अनेकदा मोठे व्हिडीओ कट करून टाकता येतात. व्लॉगर असे व्हिडीओ तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यासाठी वेगवेगळ्या थीम निवडतात ज्यामुळे त्यांना इंटरनेट वापरकर्त्यांचे लक्ष आकर्षित करण्यास मदत होते. ॲक्टिव्ह इंटरनेट युजर्सला दररोज अनेक प्रकारचे व्लॉग बघायला आवडतात. अर्थात, ते कोणत्या प्रकारचे व्लॉग पाहू इच्छितात हे त्यांच्या आवडीवर अवलंबून असते.
ऑनलाइन लोकप्रियता मिळवण्यासाठी सर्व वयोगटातील लोकांना व्हिडिओ बनविणे आवडते. मात्र नुकत्याच झालेल्या एका व्लॉगने अनेकांची मने जिंकली असून नेटकऱ्यांनी त्याला ‘आतापर्यंतचा सर्वात क्यूट व्लॉग’ असा टॅग दिला आहे. व्लॉगमध्ये एक मूल केदारनाथमध्ये लोक विकत घेत असणाऱ्या सुंदर वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. केदारनाथचा दौरा करताना तो दुकानांना भेट देतो आणि त्या ठिकाणी लोकांना काय खरेदी करायला आवडते हे दाखवतो. मुलाने व्लॉगची सुरुवात असे म्हणत केली, “अरे मित्रांनो, केदारनाथमध्ये खूप चांगल्या गोष्टी सापडतात. चला तुम्हाला दाखवतो.”
सर्वप्रथम तो एका छोट्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेले चंदनाचे छोटे तुकडे दाखवतो. पुढे तो एका टेबलावर ठेवलेल्या भगवान शंकराच्या छोट्या मूर्ती दाखवतो. नंतर तो ड्रायफ्रुट्सची काही पाकिटे दाखवतो. आपल्या व्लॉगमध्ये हा मुलगा केदारनाथ मंदिराच्या काही छोट्या प्रतिकृतीही दाखवतो. तो मुलगा एक मंदिर हातात घेतो आणि त्याचे कौतुक करतो. याशिवाय त्याची किंमतही त्यांनी सांगितली. तसेच १०० रुपयांसाठी तो तिथे सौदेबाजी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. इंटरनेटवर हा व्हिडिओ वारंवार पाहिला जात आहे.