पुणे: दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. यंदा 10 जुलैला पार पडणार्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. विठ्ठलाची (Vitthal) वारी हा फोटोग्राफर्ससाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. विठ्ठलाच्या भक्तीत रमलेला भक्त, पायी चालत जाणारे वारकरी, दमलेला थकलेला पण तरीही त्या माऊलीचा तो प्रसन्न चेहरा! यापेक्षा चांगला विषय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी असूच शकत नाही. वारीच्या काळात अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. आपण जरी वारीत सहभागी नसलात तरी या पोस्ट्स बघून आपल्यालाही वारीत (Wari2022) सहभागी झाल्यासारखंच वाटेल…
पुणे पोलिसांची ही पोस्ट बघा तुम्हाला नक्की आवडेल! प्रेमात माणूस सुंदर दिसतो असं म्हणतात. मग ते प्रेम माणसाने माणसावर केलेलं असू किंवा माणसाने देवावर! या माऊली बघा भक्तीत काय सुंदर दिसतायत
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
No caption needed. Agree?#Wari2022 pic.twitter.com/7o6chks61l
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) June 24, 2022
दिवे घाटात जेव्हा वारी येते तेव्हा ते दृश्य नयनरम्य असतं! असं वाटतं यापेक्षा सुंदर कायच असू शकतं असून असून…कधी वाटलं होतं का गर्दी सुद्धा सुंदर दिसू शकते? अहो भाविकांची गर्दी कधीही सुंदर!
पांडुरंगा, आलो तुझीया दारी
चरणी अर्पिली सेवा, वारकरी
मागणे एक तुझ्या पायी देवा
जन्मोजन्मी घडू दे तुझी सेवा#Pune, Aerial View of Sant Dnyeshwar Maharaj Palkhi moving out of #PuneCityPolice limits from Dive Ghat side for you..#Wari2022 pic.twitter.com/gZzmPvz3ne— CP Pune City (@CPPuneCity) June 24, 2022
वारकऱ्यांनी पोलीसांच्या रुपात अन पोलीसांनी वारकऱ्यांच्या रुपात आज विठ्ठल पाहीला…
Good night, #Pune!
As #Palkhi embarks on the next leg of its beautiful journey tomorrow early morning, here is our today’s ‘PIC OF THE DAY’ for you..?
वारकऱ्यांनी पोलीसांच्या रुपात अन पोलीसांनी वारकऱ्यांच्या रुपात आज विठ्ठल पाहीला…
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी ||#Wari2022 pic.twitter.com/dqK1EnCVPA
— CP Pune City (@CPPuneCity) June 23, 2022
#wari2022#Morning pic.twitter.com/kKzEwu4BZn
— Vidarbha24News (@Vidarbha24news) June 26, 2022
हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. यंदा तब्बल दोन वर्षानंतर हे सर्व अनुभवता येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे.