कोकणात (Konkan) किंवा गोव्यातच (Goa) नव्हे तर मुंबईतल्याही (Mumbai) बहुतांश भागात खेकडा (Crab) ही खायची गोष्ट आहे. पण खेकड्याच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. त्या जातींमध्ये नानाविविध प्रकारचे खकडे आढलून येतात. खेकडा गॅन्गच्या अशाच एका भयंकर दिसणाऱ्या खेकड्यानं ऑस्ट्रेलियातल्या (Australia) एका बेटावर जे केलं, ते पाहून अनेकांना घाम फुटलाय.. खेकडा पकडणाऱ्यांनी तर हा व्हिडीओ (Viral Video) बघितलाच पाहिजे.
खेकडा गॅन्गच्या या खेकड्यानं एका गोल्फ कोर्सवर जाऊन धुमाकूळ घातला. ज्यानं गोल्फ खेळता जातो, त्याचा दांडा आपल्या धारदार दातांनी या खेकड्यानं अक्षरशः तोडून टाकलंय. खेकड्यानं जितक्या सहजपणे या दांड्याचे चावून दोन तुकडे केले आहेत, ते पाहून हा खेकडा किती भयंकर आणि जीवघेणा ठरु शकतो, याची कल्पना करुनच अनेकांना घाम फुटलाय.
केरी बुहनेर नावाच्या एका महिलेनं आपल्या युट्युब चॅनेलवर या खेकड्याचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सगळ्यांना या व्हिडीओनं खेकड्यांचं खरं रुप दाखवलंय. केरी यांचे पती पॉल हे गोल्फ खेलण्यासाठी गेले होते. शुक्रवारी जेव्हा ते गोल्फ खेळण्यासाठी गेले तेव्हा त्यांना एक भयानक खेकडा आढलून आला.
या खेकड्याला त्यांनी आपल्या हातांनी उचलूनही घेतलं. मात्र हा खेकडा इतका मोठा आणि अवाढव्य होता, की सामान्य खेकड्याच्या तुलनेत हा खेकडा त्यांच्या हातात मावणारा नव्हता. गोल्फ खेळण्यासाठीच्या सामानावर त्यांनी या खेकड्याला ठेवलं. त्यानंतर त्याची फिरकी घेत असताना या खेकड्यानं चक्क गोल्फ ज्यानं खेळतात, त्याचा दांडाच आपल्या नांग्यांनी तोडून टाकला. हे पाहून केरी यांचे पतीही चकीत झाले. हा खेकडा खूपच भयंकर असल्याची जाणीव त्यांना झाली. अखेर या खेकड्याला त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. पण त्याआधी या खेकड्यानं जे काही केलं, त्याचा तीन मिनिटं तेरा सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला ते विसरले नाहीत.
घरी आल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रसंग आपल्या पत्नीला सांगितलं. रेकॉर्ड केलेला व्हिडीओही दाखवला. केरीदेखील हा व्हिडीओपाहून अवाक् झाल्या. त्यानंतर नंतर हा व्हिडीओ आपल्या युट्युब अकाऊंटवरुन शेअर केलाय. या व्हिडीओची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. पण अजस्त्र दिसणारा हा खेकडे नेमका आहे कोण? हे ही तुम्ही जाणून घ्यायला हवं. ते आम्ही सांगूच.. पण त्याआधी हा व्हिडीओ पाहून घ्या..
व्हिडीओ पाहून झाला असेल, तर आता या खेकडा गॅन्गच्या या खेकड्याबद्दल थोडं समजून घ्या. भयंकर दिसणाऱ्या या खेकड्याला रॉबर क्रॅब असंही म्हटलं जातं. कोकोनट क्रॅब म्हणूनही हा खेकडा प्रसिद्ध आहे. साधारण चार किलोच्या आसपास या खेकड्याचं वजन असतं. हा खेकडा एक मीटर लांबीचा असतो. बीरगस लॅट्रो असं या खेकड्यानं वैज्ञानिक नाव असून या खेकड्याचा जबडा माणसाच्या जबड्याच्या तुलनेत तब्बल पाच पट इतकी ताकद निर्माण करु शकतो.
इsssश! धावत्या बाईकवर नको ते चाळे करणारे ते दोघं कोण? Viral Videoनं चर्चांना उधाण
VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
घर स्वप्नांचं : निवड तुमची, शिफारस तज्ज्ञांची; गृह कर्ज की होम फायनान्स?