प्राण्यांचे अनोखे रूप दाखविणाऱ्या व्हिडिओंची इंटरनेटवर कमतरता नाही. प्राण्यांचे साम्राज्य आश्चर्याने भरलेले असल्याने प्राण्यांच्या सवयी, त्यांच्या गोष्टी नेहमीच पाहण्यात मनोरंजक असतात हे नाकारता येत नाही. तसेच, अनेक प्रजातींमध्ये अद्वितीय आणि विलक्षण क्षमता असतात ज्या त्यांना केवळ भक्षकांशी लढायलाच मदत करत नाहीत तर प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना सुरक्षित ठेवतात. नुकतंच एका व्हायरल व्हिडीओमध्ये ऑक्टोपसच्या (Octopus Viral Video) भोवतालनुसार रंग बदलण्याची (Changing Colors) अविश्वसनीय क्षमता दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर (Internet) फिरत आहे.
व्हायरल ऑक्टोपस व्हिडिओ समुद्राच्या पात्राभोवती फिरणारा ऑक्टोपस आणि आजूबाजूच्या जीवजंतूंनुसार त्याच्या त्वचेचा रंग बदलताना दिसत आहे. ऑक्टोपसने रंग बदलणे हे एक अविश्वसनीय उदाहरण आहे. हा व्हिडीओ मोझांबिकच्या किनाऱ्यावर काढलाय. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना ‘वंडर ऑफ सायन्स’ने लिहिले की, “तुम्ही कधी ऑक्टोपसचा रंग बदलताना पाहिला आहे का? ऑक्टोपस डोळ्याच्या झटक्यात रंग बदलू शकतात, ते सरासरी गोल्डन रिट्राइव्हरइतके स्मार्ट असतात.’ दरम्यान, या व्हिडिओचं श्रेय निक रुबर्ग यांना देण्यात आलं होतं.
Have you ever seen an Octopus change colour? ? Octopuses can change color in the blink of an eye, can squeeze through any crack larger than their eyeball and are as smart as the average golden retriever. #WorldOctopusDay
? IG rubergnick pic.twitter.com/Li2DSO33Ao
— Vetster (@Vetster) October 8, 2021
ऑक्टोपस रंगछटा बदलू शकतात कारण त्यांच्याकडे क्रोमाटोफोर असतात – लहान, रंग बदलणारे अवयव जे ऑक्टोपसच्या त्वचेवर ठिपकेदार असतात. प्रत्येक क्रोमॅटोफोरच्या मध्यभागी झेंथोमॅटिन नावाच्या रंगद्रव्याच्या नॅनोकणांनी भरलेल्या लहान थैल्या असतात. ऑक्टोपस प्रत्येक थरातील क्रोमॅटोफोरचा आकार बदलून हे रंग एकत्र करू शकतात, ज्यामुळे सेफॅलोपॉड्सला रंगछटांची विस्तृत श्रृंखला तयार करता येते.