मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लग्नातले विविध व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नातल्या व्हीडिओमध्येही वरातीतील व्हीडिओ जास्त पसंत केले जातात. सध्या मिरवणुकीतील असाच नाचतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलतोय. वहिनींनी दिराच्या (groom video) लग्नात डान्स केलाय. याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) खूप व्हायरल (viral video) होतोय.
सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ मिरवणुकीचा आहे. या व्हीडिओमध्ये वराच्या वहिनी आपल्या भाओजीच्या लग्नात जोरदार नाचताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर या व्हीडिओने धुमाकूळ घातलाय. मिरवणुकीचा हा व्हीडिओ लोकांना खूप आवडला आहे. या व्हीडिओमध्ये नवरदेव घोड्यावर बसलेला दिसतोय. यावेळी त्याच्या दोन वहिनी रस्त्यावर नाचताना दिसत आहेत.
व्हीडिओमध्ये वराच्या वहिनी लेहेंग्यामध्ये डान्स करताना दिसत आहेत. ‘लो चली मै अपने देवर की बारात ले के’, या गाण्यावर त्या डान्स करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या वहिनींना नाचताना पाहून घोडीवर बसलेला नवरदेवही स्वतःला थांबवू शकत नाही. तोही नाचू लागतो. तो घोड्यावर डान् करतोय. witty_wedding या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. मिरवणुकीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. वहिनींची ही बिन्धास्त स्टाईल अनेकांना आवडतेय. व्हीडीओतील दीर भावजयांचा हा डान्स अनेकांना आवडतोय.
लग्नाचा सिझन असल्याने सध्या काही व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. आणखी एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरी मुलगी डान्स कराताना दिसतेय तिच्यासोबत तिच्या सहा मैत्रिणीही पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओत वधू आणि तिच्या मैत्रिणींनी पलक तिवारीच्या ‘बिजली’ गाण्यावर डान्स करत आहेत. हा डान्स एवढा भारी आहे की हा व्हीडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. वधू आणि तिच्या 6 मैत्रिणी बँक्वेट हॉलमध्ये डान्स स्टेजमध्ये प्रवेश करतात. यानंतर सर्वजण नाचू लागतात. हा व्हीडिओ theweddingbrigade नावाच्या इन्स्टाग्म अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.