मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अश्यात सोशल मीडियावर ल्गनातील विविध व्हीडिओ (Wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच लग्नातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवदेवाची वरात निघालेली दिसतेय. पण ही वरात जरा हटके आहे. यात बॅन्ड बाजा वरात घोडा हे सगळं तर आहेच पण आणखी एक खास गोष्ट आहे जी वरातीत कधीही पाहायला मिळत नाही. ती म्हणजे ही वरातीच्या डोक्यावर मंडप पाहायला मिळतोय. या मंडपाच्या खालून ही वरात निघालेली दिसतेय. कारण सध्या ऊन खूप आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडपाचा सहारा घेतलेला दिसतोय. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (viral video) होत आहे.
लग्नातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवदेवाची वरात निघालेली दिसतेय. पण ही वरात जरा हटके आहे. यात बॅन्ड बाजा वरात घोडा हे सगळं तर आहेच पण आणखी एक खास गोष्ट आहे जी वरातीत कधीही पाहायला मिळत नाही. ती म्हणजे ही वरातीच्या डोक्यावर मंडप पाहायला मिळतोय. या मंडपाच्या खालून ही वरात निघालेली दिसतेय. कारण सध्या ऊन कूप आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडपाचा सहारा घेतलेला दिसतोय. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Sun shade and mobile secure enclosure for barat. Innovations galore pic.twitter.com/rdxUV45Qfg
— Aviator Anil Chopra (@Chopsyturvey) April 27, 2022
हा व्हीडीओ सूरतचा असून Chopsyturvey या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. “वरातीचं उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून चालता मांडव. चांगली कल्पना आहे ना?”, असं या व्हीडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या अंदाजात प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भारतीय जुगाडचे कौतुक!, हे फक्त भारतीयच करू शकतात”, असं एकाने लिहिलं आहे. दुसऱ्याने म्हटलंय की, “उष्णतेची लाट भारतीय लग्न थांबवू शकत नाही.” तिसरा म्हणतो,”मानलं भाऊ जिद्द असावी तर अशी! लग्न करायचं म्हणजे करायचंच काहीही होवो…”