लग्न हे एक पवित्र बंधन आहे. दोन माणसे आयुष्यभर एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण जरा कल्पना करा की लग्नात तुमच्या एक्स बॉयफ्रेंडला बोलवलं तर काय होतं? असाच काहीसा प्रकार चीनमध्ये घडला आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे. एका नववधूने तिच्या लग्नाचे निमंत्रण एक्स बॉयफ्रेंडलाही पाठवले होते. या संपूर्ण समारंभात त्यांना विशेष वागणूक देण्यात आली आणि जेवणाचे खास टेबलही ठेवण्यात आले. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावर युजर्स जोरदार कमेंट करत आहेत.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हुबेई प्रांतात 8 जानेवारीला हा विवाह सोहळा पार पडला. त्याचे फोटो चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Douyin) आहेत. या फोटोंमध्ये पाच मुलं डायनिंग टेबलवर बसलेली आहेत. असा दावा केला जात आहे की हे सर्व वधूचे एक्स बॉयफ्रेंड आहेत, ज्यांना लग्नात खास आमंत्रित करण्यात आले होते.
टेबलावर त्या सर्वांच्या शेजारी एक नेम प्लेटही होती, त्यावर ‘टेबल ऑफ एक्स बॉयफ्रेंड’ असंही लिहिलं होतं. ते सर्व एकत्र बसले होते पण त्यातील काहीजण अस्वस्थ वाटत होते. त्याच्यासोबत टेबलावर दोन महिलाही बसल्या होत्या. व्हायरल झालेले फोटो पाहून युजर्सने याला ‘सगळ्यात विचित्र जेवण’ म्हटले आहे. एका युजरने लिहिलं- लग्नात आपल्या एक्स बॉयफ्रेंडला आमंत्रित करणं ही खूप धाडसाची गोष्ट आहे. यामुळे नातेही बिघडू शकले असते.
वधूच्या या कामगिरीवर काही युजर्सनी संतापही व्यक्त केला. इतर अनेक युजर्सने असेही म्हटले आहे की, टेबलवर बसलेली माणसे एकमेकांसोबत खूप छान बोलत आहेत. मात्र, लग्नात एक्स बॉयफ्रेंडला आमंत्रित करण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी जून 2022 मध्ये एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात 9 पुरुष ‘एक्स बॉयफ्रेंड्स’ टेबलवर बसले होते. अशीच एक घटना गुआंगडोंग प्रांतात घडली आहे.