दिल्ली : सध्या तरुणांमध्ये स्टंट (Stunt) करण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. नवीन स्टंट करण्यासाठी तरुणाई खूप उत्सुक असते. पण हे करत असताना अनेकदा त्यांच्याकडून अशी चूक होते की जी त्यांच्या जिवावर येते. केवळ सोशल मीडियावर (Social media) लोकप्रिय होण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, काही लोक यात यशस्वी होतात. तर काही जण चेष्टा बनवतात. सध्या अशाच एका बाईक स्टंटचा (Bike Stunt) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत देखील आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पहिल्यांदा हैराण व्हाल. मग तुम्ही तुमच्या हशावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. तुम्ही व्हिडीओ पाहून प्रचंड हसाल. यानंतर तुम्हीही म्हणाल काय हिरोपंती निघाली राव…
व्हयरल होत असलेल्या या स्टंट व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती विरुद्ध दिशेनं चालत्या बाईकवर बसला आहे. तर दुसरा माणूस त्याच्या मागे उभा राहून स्टाइल मारत आहे. आपण पाहू शकतो की स्टंट त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. गाडीवर बसलेल्या या लोकांना अजिबात भीती वाटत नसल्याचं दिसतंय. मात्र, याकडे दुर्लक्ष करून तो माणून उभा राहून मोबाईलवर सेल्फी घेत आहे. पुढच्याच क्षणी त्या माणसाचा तोल बिघडतो आणि तो रस्त्यावर समोरासमोर पडतो. त्याचवेळी विरुद्ध दिशेला बसलेला मुलगा चालत्या दुचाकीने झुडपात शिरतो. चला तर मग पाहूया स्टंट व्हिडीओ
27 सेकंदाचा बाईक स्टंट व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटीफॉर्म इंस्ट्राग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 8 हजार व्ह्यूज आले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील नेटिझन्स या दोन्ही मुलांची चांगलीच मजा घेतायेत. या व्हिडीओवर बहुतांश लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजर्सने कमेंट करून लिहिलं आहे की, गया…टाटा…बाय-बाय.. त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटलं आहे की, दोघांनीही मजा केली. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने कमेंट्स करता म्हटलं आहे की, काय मुर्खपणा आहे. या दोघांना पोलिसांच्या ताब्यात द्या. एकंदरीत हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हसत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल देखील होत आहे.