सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक फोटो व्हायरल होतात. अनेक चित्रं इतकी चांगली असतात की आपल्याला ती पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. त्याचबरोबर अशी अनेक चित्रं आहेत, जी पाहिल्यानंतर आपण पूर्णपणे स्तब्ध होतो. ज्यामुळे आपला डोकं खूप खराब होतं. ऑप्टिकल इल्यूजनची चित्रं अशी असतात.
ऑप्टिकल इल्यूजन कोडे सोडवण्याची एक वेगळी मजा आहे कारण यामुळे आपल्या मेंदूला खूप व्यायाम मिळतो. एका रिपोर्टनुसार ऑप्टिकल इल्यूजनमुळे तुम्हाला तुमचं निरीक्षण कौशल्यं सुधारण्यास मदत होते.
तुम्हालाही या ऑप्टिकल इल्यूजनसह उत्तम ऑब्झर्व्हर व्हायचं असेल आणि डोळ्यांची परीक्षा घ्यायची असेल, तर हे चॅलेंज तुम्ही घ्यायलाच हवं.
या व्हायरल फोटोकडे नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की, फक्त ब्लॅक अँड व्हाइट पॅटर्न दिसतील. परंतु या ओळींमध्ये एक इंग्रजी शब्द लपलेला आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याकडे फक्त 12 सेकंद आहेत.
या चित्राच्या आत काय लिहिले आहे, हे जर तुम्ही या निर्धारित वेळेत सांगितले, तर आपण असे गृहीत धरू की, तुमच्याकडे गरुडासारखी दृष्टी आहे. समजा नाहीच सापडलं उत्तर किंवा चुकलं उत्तर तर याचा अर्थ असा नाही की तुमचे डोळे वाईट आहेत, त्यावर फक्त काम करण्याची गरज आहे.
जर तुम्हालाही याचा कंटाळा आला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, चित्रात लिहिलेला इंग्रजी शब्द हा SEE आहे. सतत या फोटोकडे जर पाहिलं तर डोळे धूसर झालेले दिसतात. पण नीट पाहिलं तर उत्तर सापडतं.