देवउठनी एकादशी झाली कि लग्नसोहळ्याला सुरुवात होत असते. त्यातच आपल्यातील खास व्यक्ती म्हणजे भावंडं किंवा मित्रमैत्रिणी हे यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यात तुम्हाला लग्नाचे आमंत्रण आले असेलच. अशा वेळेस लग्नाला जाताना आपण रिकाम्या हातानी न जाता आहेर पाकीट किंवा भेटवस्तू घेऊन जात असतो. पण कधी कधी आपल्या भावंडं व मैत्रिणीच्या लग्नात काय गिफ्ट देता येईल हा एक मोठा प्रश्न पडत असतो. खरं तर लग्नात गिफ्ट देताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, गिफ्टचा उपयोग तुमच्या व्यक्तीच्या आवडीची असून लग्नानंतर सुरू होणाऱ्या नव्या आयुष्यातही झाला पाहिजे. तुम्हालाही जर तुमच्या मित्राला असेच गिफ्ट द्यायचे असेल तर आम्ही काही गिफ्ट आयडिया सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता.
कस्टमाइज्ड फोटो फ्रेम : वधू-वराच्या फोटोसोबत तुम्ही त्यांना कस्टमाइज्ड फोटो फ्रेम गिफ्ट करू शकता जी ते त्यांच्या बेडरूममध्ये ठेवू शकतात. पण फ्रेम खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या रूमची थीम आणि कलर लक्षात ठेवा. याशिवाय कपल्ससाठी कस्टमाइज्ड टॉवेल आणि शॉवर कोट सेट देऊ शकता. त्यांच्यासाठी ही एक अनोखी आणि संस्मरणीय भेट ठरू शकते.
सुंदर घड्याळ, सुवासिक मेणबत्त्या अशा काही शोभेच्या भेटवस्तू तुम्ही नवं वर-वधूना देऊ शकता. घर सजावटीच्या अश्या काही वस्तू देऊन द्या जेणे करून त्यांचे घर किंवा खोली आणखी सुंदर आणि खास दिसेल. पण या गोष्टी निवडताना रूमची थीमही पाहा, कारण या गोष्टी थीमनुसार असतील तर रूमचा लूक आणखी वाढेल. याशिवाय त्यांच्या घराच्या भिंतींवर चांगले बसू शकतील अशी हँडमेट पेंटिंग्सही भेट म्हणून देता येतील.
जर तुम्हाला तुमच्या मित्राला आयुष्यभरासाठी स्पेशल एक्सपेरिअन्स द्यायचा असेल तर लग्नानंतर तुम्ही वधू- वरासाठी कॅंडल लाईट डिनर आयोजित करू शकता, त्यांना डिनर डेटवर पाठवू शकता किंवा रिसॉर्ट बुक करू शकता. याशिवाय जर तुमचे बजेट चांगले असेल किंवा तुमचा मित्र-मैत्रिणीचा ग्रुप असेल तर तुम्ही सर्व मिळून त्यांना हनीमून प्लॅन किंवा व्हाउचर गिफ्ट करू शकता. याशिवाय तुम्ही जोडप्यासाठी एक स्पा व्हाउचर देखील देऊ शकता ज्यामध्ये ते एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन लग्नाचा थकवा दूर करून आराम करू शकतात.
मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाला दागिने आणि ॲक्सेसरीज आवडतात. आपण असं बोलू शकतो कि मुलांकडे पर्याय कमी असतात पण तुम्ही प्रयत्न करून त्यांच्यासाठी छान भेटवस्तू घेऊ शकता. आपण आपल्या मित्राला घड्याळ किंवा ब्रेसलेट भेट देऊ शकता. आवडत्या ब्रँडचा चष्मा, बेल्ट किंवा पर्स देऊ शकता किंवा मुलांचे ऑल टाइम फेव्हरेट शूजही देऊ शकता. त्याचबरोबर मित्राच्या बायकोला काही द्यायचं असेल तर एक कस्टमाइज्ड ज्वेलरी बॉक्स द्या जो दोघांनाही कायम लक्षात राहील.
मोबाईल आणि गॅझेट्सची आवड कोणाला नाही? जर तुमचा मित्रही या गोष्टींचा चाहता असेल तर तुम्ही सर्व मित्र मिळून त्याला त्याचा आवडता मोबाईल, ब्लूटूथ स्पीकर, घड्याळ किंवा होम थिएटर देऊ शकता. आपल्यासाठी संस्मरणीय ठरेल, कारण आपण दिलेल्या भेटवस्तू वापरू शकणार आहे.
जर तुमच्या मित्राला ॲडव्हेंचर आवडत असेल आणि तुम्हाला त्याच्या आवडीचं असाच गिफ्ट द्याचे असेल तर लग्नानंतर मौजमजेसाठी म्युझिक कॉन्सर्ट, वॉटर पार्क किंवा एंटरटेनमेंट पार्क व्हाउचर देऊन भेट देऊ शकता. याशिवाय मित्राला म्युझिक कॉन्सर्टची आवड असेल तर तुम्ही त्याला म्युझिक कॉन्सर्टची तिकिटंही देऊ शकता.