भारतात किती टक्के महिला पितात दारु? गावातील महिलांची संख्या अधिक, जाणून व्हाल थक्क

| Updated on: Dec 04, 2024 | 3:31 PM

Drink: अधिक दारु पिणाऱ्या महिलांची संख्या भारतात कुठे अधिक... शहरी भागात की ग्रामीण भागात? भारतात किती टक्के महिला पितात दारु? जाणून व्हाल थक्क

भारतात किती टक्के महिला पितात दारु? गावातील महिलांची संख्या अधिक, जाणून व्हाल थक्क
Follow us on

भारतात दारु पिणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एक जर्मन संस्थेच्या रिसर्चनुसार, 2010 ते 2017 पर्यंत भारतात दारुच्या विक्रीत मोठी वाढ होती. ही वाढ 38 टक्क्यांनी वाढली आहे. या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारतात दारुची वर्षाला विक्री 4.3 लीटरने वाढून 5.9 लीटरवर पोहोचली आहे. यामध्ये फक्त पुरुषांचा समावेश नाही तर, महिलांचा देखील समावेश आहे.

सांगायचं झालं तर, भारतात पुरुषांनी दारू पिणं हे वाईट व्यसन मानलं जाते. अशा स्थितीत महिलेने दारू पिल्याने गोंधळ उडतो. पण आता त्यांच्यावर देखील परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. भारतात दारु पिणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाच्या शिखरावर असल्याच्या दावा करण्याऱ्या महिला आता दारु पिण्यामध्ये देखील पुढे आहेत.

2019 मध्ये केंद्रीय राज्य मंत्री रतल लाल कटारिया यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात देशातील दीड कोटी महिला कोणत्या ना कोणत्या अमली पदार्थाचे सेवन करतात, असं सांगितलं होतं. कटारिया यांनी संसदेत पंकज चौधरी यांच्या प्रश्नाचं उत्तर देत NDDTC आणि AIIMS च्या 2019 च्या रिपोर्टच्या आधारावर सांगितलं होतं की, आमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या महिलांमध्ये 90 लाख महिला दारूचं सेवन करतात.

हे सुद्धा वाचा

कटारिया यांनी सांगितलं होतं की, प्रत्येक 16 मधील एक महिला दारू शिवाय राहू शकत नाही. देशात असं कोणतंच राज्य नाही जेथे महिला दारू पित नाही.  महिलांच्या वाढत्या संख्येचा हाच दावा नाही, तर केंद्र सरकारचा 2019 ते 2022 दरम्यानचा राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणही हेच सांगत आहे.

सर्व्हेनुसार, 2022 मध्ये समोर आलेल्या आकड्यांनुसार, देशात वर्षाला तब्बल 16 कोटी लोकं दारु पितात. ज्यामध्ये 15 वर्षांपुढील 19 टक्के पुरुष आणि 1.03 टक्के महिला आहेत. दारु पिणाऱ्या पुरुषांमध्ये 19.9 टक्के शहरी भागातील पुरुष आहेत. तर 16.5 टक्के ग्रामीण भागातील पुरुष आहेत. तर महिलांमध्ये याच्या उलट स्थिती आहे. ग्रामीण भागातील 1.6% आणि शहरांमधील 0.6% महिला दारूच्या शौकीन आहेत.

दारु पिणाऱ्या महिलांच्या संख्येत अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांची संख्या 24% इतकी आहे, तर सिक्कीम या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.