ATM मधून पैसे काढणं आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. एटीएममुळे पैशाच्या बाबतीत बरीच सोय झाली असली तरी एटीएमशी संबंधित प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात कायम आहेत. उदाहरणार्थ, एटीएम मधून पैसे काढताना जर दुप्पट पैसे तर काय करावे? हे पैसे ग्राहकाचे असतील की ते बँकेला परत द्यावे लागतील? याबद्दल समजून घेऊया कारण नुकतेच सोशल मीडियावर एका युजरने असे विचारले, तेव्हा लोक यावर लोकं उत्तर देऊ लागले.
खरं तर नुकतंच सोशल मीडियावर एकाने विचारलं, एटीएममधून जर पैसे काढताना दुप्पट पैसे पैसे बाहेर आले तर काय? या प्रश्नाचे उत्तर केस स्टडीचा हवाला देऊन सांगण्यात आले की असे झाले तर काय होईल. काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडमधील एका शहरातून तिथल्या एटीएम मशिनमध्ये अचानक काहीतरी घडल्याची घटना उघडकीस आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार तिथल्या लोक जेव्हा जेव्हा पैसे काढायला जात होते तेव्हा दुप्पटच पैसे बाहेर येऊ लागले. त्यामुळे तिथल्या प्रत्येकाला आधी पैसे काढायचे होते. याची माहिती लोकांना मिळताच चेंगराचेंगरी झाली. यानंतर पोलिसांना बोलवावं लागले. जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा लोक तिथून पैसे काढत होते. ते येताच पोलिसांनी बँकेला माहिती दिली. यानंतर गर्दीवर नियंत्रण आणून एटीएम दुरुस्त करण्यात आले.
एटीएम दुरुस्त झाल्यावर तेथून गर्दी हटवण्यात आली. दुप्पट पैसे काढणाऱ्यांना कायद्यानुसार अर्धे पैसे परत करावे लागत होते. बँकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. अशा वेळी बँकेत पैसे परत करावेत, अशी नैतिकता आहे, पण एटीएममध्ये बिघाड झाला आणि असा कुठलाही नियम नसल्याचं जाणकारांचे मत आहे.