बॉसला पाठवलेले व्हॉट्सॲप मेसेज किंवा ईमेल पाठवण्यापूर्वी तुम्ही किती वेळा वाचता? पुन्हा पुन्हा? कारण छोट्याशा चुकीमुळे तुम्ही बॉसच्या नजरेत येऊ नये अशी तुमची इच्छा असते. पण कधी विचार केला होता की अरे हा शब्दही एखाद्या ‘बॉस’ला आक्षेपार्ह वाटेल. जर तुम्हाला वाटत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा स्क्रीनशॉट वाचा. अर्थात, यानंतर तुम्ही तुमच्या बॉसला मेसेज करताना Hey, Man आणि Dude असे शब्द वापरणार नाही.
हा स्क्रीनशॉट एका रेडिट युजरने शेअर करत लिहिलं आहे की, “तुम्ही यावर कशी प्रतिक्रिया द्याल?” या पोस्टला 53 हजारांहून अधिक लाईक्स आणि 6 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. बहुतेक युजर्स लिहित आहेत की, भारतात बॉसना नेहमीच ‘सर’ ऐकायला आवडतं. तर काहींनी लिहिलं की, प्रत्येक बॉस असा नसतो.
सुरुवातीला तुम्हाला संभाषणाचा हा स्क्रीनशॉट अगदी नॉर्मल वाटेल. पण मेसेज वाचल्यानंतर तुम्हाला खरी अडचण समजेल. बॉसचा मेसेज आला- “हाय श्रेयस, तू टेस्ट सबमिट केलीआहेस का?” त्या श्रेयसने Hey लिहिलं- “Hey नाही, अजून नाही.” बॉसला ते पचवता आले नाही. त्याने लगेच श्रेयसला सांगितले की, तो प्रोफेशनल नाही. म्हणजे Hey लिहिणारा माणूस त्यांना आवडला नाही.
श्रेयसच्या या मेसेजला उत्तर देताना ‘बॉस’ने लिहिलं- “हाय श्रेयस, माझं नाव संदीप आहे. प्लीज Hey वापरू नकोस. हे मला आक्षेपार्ह वाटते. माझं नाव आठवत नसेल तर Hi लिहून मला पाठव. व्यावसायिक जगात कधीही Dude किंवा Man लिहू नको. त्याऐवजी Hello लिहिता येईल. तसेच वरिष्ठांनी कधीही Chap किंवा Chick लिहू नये.”