नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : भारतीय नोटांवर आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांचा हसरा चेहऱ्याचा फोटो पाहतो, तो नेमका केव्हा छापण्यात आला. त्याआधी नोटांवर कोणाचे छायाचित्रं होतं. महात्मा गांधी यांचा तो प्रसिध्द फोटो कोणी काढला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साल 1949 पर्यंत नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो विराजमान झाला नव्हता. त्याऐवजी केवळ अशोक स्तंभाचे छायाचित्र छापलं जायचं, तर पाहूया नेमका काय आहे का रंजक इतिहास..
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. परंतू दोन वर्षे नोटांवर ब्रिटनचे राजे किंग जॉर्ज सहावे यांचा फोटो होता. 1949 मध्ये भारत सरकारने प्रथम एक रुपयांच्या नोटांचे नवीन डीझाईन केले. आणि किंग जॉर्ज यांच्या जागी अशोक स्तभ आला. 1950 मध्ये सरकारने 2,5,10 आणि 100 रु.च्या नोटा छापल्या. यावर अशोक स्तंभ होता. त्यानंतर आर्यभट्ट सॅटेलाईटपासून कोणार्क सूर्य मंदिर आणि शेतकरी नोटांवर आले.
साल 1969 मध्ये नोटांवर प्रथम महात्मा गांधी यांचा फोटो आला. महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हा निर्णय झाला. साल 1987 दुसऱ्यांदा पाचशे रु.नोटेवर गांधी याचा फोटो आला. 1995 मध्ये रिझर्व्ह बॅंकने स्थायी स्वरुपात महात्मा गांधी यांच्या फोटोला स्थान देण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठविला. 1996 मध्ये अशोक स्तंभाच्या गांधी यांचा फोटो छापला गेला. तरीही अशोक स्तंभ संपूर्ण हटविला नाही. एका बाजूला छोट्या आकारात छापण्यात आला. साल 2016 मध्ये आरबीआय महात्मा गांधींच्या छायाचित्रांच्या नोटांची नवीन मालिका आली. नोटाच्या दुसऱ्या बाजूला ‘स्वच्छ भारत अभियान’ चा लोगो छापण्यात आला.
आज पाचशे रुपयांच्या नोटांसह अन्य नोटांवर गांधी यांचा हसरा फोटो आहे, तो साल 1949 मधील कोलकाताच्या व्हाईसरॉय हाऊस येथील आहे. ब्रिटीनचे लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक लॉरेंस यांनी गांधी भेटायला आले तेव्हाचे हे छायाचित्र आहे. हे छायाचित्रे नेमके कोणी काढले किंवा या छायाचित्राची नोटांसाठी कोणी निवड केली हे आजपर्यंत कळलेले नाही.