हिंदू लोकसंख्येबाबत कोणता देश भारताच्या पुढे? तिसर्‍या क्रमांकावरील नाव वाचून तुम्ही म्हणाल काय सांगता?

| Updated on: Apr 08, 2025 | 3:15 PM

Hindu Populations : सध्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्यासाठी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. नेपाळला हिंदू राष्ट्राचा दर्जा परत मिळवून द्यावा, यासाठी तिथे रस्त्यावर तीव्र आंदोलन सुरू आहे. राजेशाही समर्थक दिवसागणिक मोठे आंदोलन उभे करत आहेत.

हिंदू लोकसंख्येबाबत कोणता देश भारताच्या पुढे? तिसर्‍या क्रमांकावरील नाव वाचून तुम्ही म्हणाल काय सांगता?
Image Credit source: गुगल
Follow us on

भारताचा शेजारील देश नेपाळ सध्या नवीन आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. राजेशाही पुन्हा आणावी यासाठी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांना पुन्हा राजगादीवर बसवावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. 2008 मध्ये संसदने नेपाळमधील 240 वर्ष जुनी हिंदू राजेशाहीचे अस्तित्व समाप्त केले होते. त्यासाठी मतदान घेण्यात आले होते. नेपाळ हे धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. राजे, ज्ञानेंद्र शाह यांना परागंदा व्हावे लागले होते. 2006 मध्ये नेपाळला धर्मनिरपेक्ष देश म्हणून जाहीर करण्यात आले होते. अर्थात हा सर्व प्रकार चीनच्या इशार्‍यावरून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता.

हिंदूची टक्केवारी अधिक

नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथल्या लोकसंख्येत हिंदूचा टक्का भारतापेक्षा पण अधिक आहे. पण लोकसंख्येचा विचार करता भारतात हिंदू सर्वाधिक आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूची टक्केवारी 80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतात 109 कोटी हिंदू आहेत. एकूण लोकसंख्येत हे प्रमाण जवळपास 78.9 टक्के इतके आहे. पण टक्केवारीत भारत मागे आहे. नेपाळमध्ये हिंदूची टक्केवारी अधिक आहे. नेपाळच्या एकूण लोकसंख्येत 80.6 टक्के हिंदू आहेत. टक्केवारीत नेपाळ अग्रस्थानी तर भारत दुसर्‍या स्थानावर आहे.

हे सुद्धा वाचा

तिसरा हिंदू बहुल देश कोणता?

नेपाळ आणि भारतानंतर हिंदू बहुल देश कोणता? असा प्रश्न पण अनेकांना पडतो. तिसरा हिंदू बहुल देश हा पूर्व अफ्रिकातील मॉरीशस हा देश आहे. मॉरिशसमध्ये हिंदूची लोकसंख्या जवळपास 51 टक्के इतकी आहे. या देशाचा अनेक हिंदू पंतप्रधानांनी कारभार पाहिला आहे. या देशात अनेक सुंदर आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरं आहेत.

नेपाळमध्ये आजच्या घडीला 2.8 कोटी हिंदू आहेत. तर 9 टक्के बौद्ध आणि 4.4 टक्के मुसलमान आहेत. तर मॉरिशसमध्ये 2011 मध्ये 48.4 टक्के हिंदू होते. सध्या तिथे हे प्रमाण 51 टक्के असल्याचा दावा करण्यात येतो. येथे हिंदूचा वृद्धी दर 2.1 टक्के आहे. त्यानंतर फिजीमध्ये हिंदूची लोकसंख्या 27.9 टक्के तर गुयानामध्ये 23.3 टक्के, भूतान देशात 22.5 टक्के आणि जगातील अनेक देशात हिंदू आहेत.