दिल्ली : मध्य प्रदेशातील मुरैना स्मशानघाटात एका मृतदेहावर अत्यंसंस्काराचे अंतिम विधी सुरू असताना अचानक चितेवरील मृतदेह हलू लागल्याने घबराट पसरली. नंतर गावातील लोकांनी नाडी तपासली तर हृदयाचे ठोके जाणवल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी ईसीजी काढला जर हृदयाचे ठोके सुरु होते. मग त्या वयस्काला ग्वाल्हेरच्या रुग्णालयात पाठवले. आणखी थोडा जर वेळ गेला असता तर गावकरी चितेला अग्नि देऊन बसले असते या विचारानेच उपस्थितांना गहीवरल्यासारखे झाले.
हा विचित्र प्रकार मुरैना शहरातील वॉर्ड क्रमांक 47 च्या शांतीधाम येथील आहे. जीतू प्रजापती नावाचा तरुण किडनीच्या प्रदीर्घ आजाराने अंथरूणाला खिळला होता. मंगळवारी सायंकाळी जेव्हा त्याच्या शरीराची हालचाल बंद पडली तेव्हा नातेवाईकांना वाटले त्याची घटीका भरली. जवळच्या लोकांनी नाकाजवळ बोट धरले. छातीला कानलावून पाहीलं तर काहीच हालचाल न झाल्याने घरात रडारड सुरू झाली. नंतर नातेवाईकांना बोलावून त्या युवकांची अंत्ययात्रा काढण्यात आली. लाकडांची चीता ही रचण्यात आली. अंतिम संस्काराची शेवटची तयारी सुरू असताना मृतदेह हलहलू लागल्याने स्मशानात पळापळ झाली. नंतर काही जाणत्या लोकांनी डॉक्टरांना बोलावून आणले. जीतूचा ईसीजी काढला. तर हृदय सुरु होते. त्यानंतर जीतूला पुढील उपचारासाठी ग्वाल्हेरला हलविण्यात आले.
जीतूच्या शरीराची हालचाल झाली नसती तर काही वेळाने त्याला मृत समजून अग्निसंस्कार झाले असते. अंत्यसंस्काराला आलेल्या एका व्यक्तीने म्हटले बरं झाले चितेला अग्नि देण्याआधी शरीराची हालचाल झाली. अन्यथा जीवंतपणी त्याला अग्नि देण्याची चुक घडली असती. सध्या तो जीवंत असला तरी त्याचे प्रकृती तितकीशी चांगली नसून चिंताजनकच आहे. या जीतूच्या नातेवाईकांकडून तपासताना चुक झाली असावी. असे होऊ शकते. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला मृत ठरविताना दोन वेळा तपासून पहावे लागते असे तेथील डॉक्टरांनी म्हटले आहे.