Animal video : सहसा हत्ती (Elephant) जंगलातच दिसतात किंवा जेव्हा लोक सर्कस पाहायला जातात तेव्हा ते तिथे दिसतात. महाकाय हत्तीला पाहुन लोक त्याच्यापासून अंतरच ठेवतात. कारण त्यांना केव्हा राग येईल, याबद्दल कोणीही सांगू शकत नाहीत. मात्र, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जंगलांच्या मधोमध रस्ते बांधण्यात आले आहेत आणि अनेक वन्य प्राणीही तेथून जातात. अशा स्थितीत तिथून कोणी जात असेल तर काळजी घ्यावी लागते. असाच काहीसा प्रकार इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसला, जेव्हा एक दुचाकीस्वार त्याच्या एका साथीदारासह रस्त्यावरून जात होता. सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीसोबत रस्त्याने चालला आहे, पण तेवढ्यात त्याला त्याच्यासमोर एक हत्ती दिसला.
गाडीवरून जाताना अचानक समोरून हत्ती आला. हत्ती आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि कधीही आपल्या दिशेने येऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटत होती. काही सेकंदानंतर चिडलेला हत्ती दुचाकीस्वाराच्या दिशेने धावू लागला. दुचाकीस्वार आपली कार तिथेच सोडून पळू लागला. त्याचा साथीदारही त्याच्यासोबत धावू लागला. हत्ती त्यांचा पाठलाग करतो तसे ते वेगात धावायला लागतात.
सुदैवाने काही अंतरापर्यंत पळून गेल्यानंतर हत्ती थांबला. दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराच्या जीवात जीव आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. @FredSchultz35 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 9 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 16हून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ 2 लाख 75 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Abandon Ship!!! ???? pic.twitter.com/khljff2gxX
— Fred Schultz (@FredSchultz35) February 21, 2022