अंतत्राया (Funeral) म्हटली की दाहीदिशी दुःख दिसतं. रडणारे चेहरे दिसतात. त्यांना सावरणारी माणसं दिसतात. सहानुभूती देणार खांदे पुढे सरसावतात. अश्रू, टाहो, आक्रोश असं सगळं चित्र अंतयात्रा म्हटली की डोळ्यासमोर येतं. पण एका अंतयात्रेत चक्क आईस्क्रिमच्या गाड्यांची (Ice-Cream) भलीमोठी रांगच बघायला मिळाली आहे. या अंतयात्रेच्या मागून एका रांगेत निघालेल्या आईस्क्रिम व्हॅन दिसून आल्यात. अंतयात्रेसारख्या दुःखाच्या प्रसंगी आईस्क्रिम कोण खातं? या प्रश्नाचं उत्तर ‘कुणीच नाही’, असंच मिळेल. पण मग या अंतयात्रेत इतक्या मोठ्या संख्येनं आईस्क्रिम व्हॅन काय करत होत्या, हा प्रश्नही उरतो. चला तर मग त्याचही उत्तर जाणून घेऊयात…
अंतयात्रा आणि आईस्क्रिमचं काय कनेक्शन?
खरंतर आईस्क्रिमची गाडी म्हटलं की, सायकरची घंटी वाजवर आईस्क्रिम विकणाऱ्यांची तुम्हाला आठवण येईल. पण ते दिवस आता केव्हा मागे सरले आहेत. आता आईस्क्रिमचे पार्लर आलेत. शिवाय एका व्हॅनमध्ये आईस्क्रिम विकणाऱ्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. ठिकठिकाणी असे आईस्क्रिम विकणारे आढळून येतात. एका एकाचवेळी एकाच अंतयात्रेत रांगेत आईस्क्रिम विकणारे दिसून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
… म्हणून आल्या आईस्क्रिम व्हॅन!
तुम्हाला जर सगळ्यांना खूश पाहायचं असेल, तर तुम्ही आईस्क्रिम विका, अशा आशयाचे कोट्स तुम्ही वाचले असतीलच! तर असे हे सगळ्यांना खूश ठेवणारे आईस्क्रिम विक्रेते आईस्क्रिमप्रमाणे मस्त असतात. अशाच एका मस्त आणि दिलखुलास आईस्क्रिम विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आईस्क्रिम विक्रेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व आईस्क्रिम विक्रेत्यांनी एका खास काम केलं. सर्व आईस्क्रिम विक्रेत्यांनी आपल्या आईस्क्रिम व्हॅनसह अंतयात्रा काढली. एका रांगेत एकामागून एक आईस्क्रिम व्हॅन मृत्यू झालेल्या आईस्क्रिम विक्रेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाल्या.
नुकताच या अंतयात्रेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लुईसा डेविएस या ट्विटर युजरनं हा व्हिडीओ पोस्ट केला. तो तुम्हाला इथं बघता येऊ शकेल. या आईस्क्रिम विक्रत्याला देण्यात येत असलेल्या अखेरच्या निरोपानं मलाही रडू कोसळलं, असं ट्विटर युजर लुईसानं म्हटलंय.
पाहा व्हिडीओ –
just witnessed an ice cream man’s funeral and all the ice cream vans came and followed in solidarity I AM SOBBING pic.twitter.com/bJhyJj4JoK
— Louisa Davies (@LouisaD__) December 17, 2021
याआधीही अशाच प्रकारे एका आईस्क्रिम विक्रेत्याला श्रद्धांजली देण्यात आली होती. बर्मिंघममध्ये एका 82 वर्षीय आईस्क्रिम विक्रेत्याचं निधन झालं होतं. तब्बल 46 वर्ष निधन झालेली व्यक्ती आईस्क्रिम विक्रेत्याचं काम करत होती. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी तेव्हा अशाच प्रकारे आईस्क्रिम वॅन एकटवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
पावलो ट्रॅव्हल्सच्या मालकालाही तसाच निरोप
दरम्यान, गोव्यातील प्रसिद्ध पावले ट्रॅव्हल्सचे मालक मारीयो परेरा यांचंही सप्टेंबर 2020मध्ये निधन झाल्यानंतर बसची अंतयात्रा काढण्यात आली होती. पावलो ट्रॅव्हल्सच्या असंख्य बस एका रांगेत हॉर्न वाजवत आपल्या लाडक्या मालकाला अंतिम निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसलं होतं.
इतर बातम्या –