भारतीय संसद भवनाला इंग्रजीत Parliament House म्हणतात. हे देशाची राजधानी दिल्लीत आहे. संसद भवनात दोन सभागृहे आहेत, ज्यांना आपण लोकसभा आणि राज्यसभा म्हणून ओळखतो. ही मूलभूत माहिती तुम्हालाही असेल. पण आज आम्ही तुम्हाला संसद भवनाच्या एका रहस्याबद्दल सांगणार आहोत. हे रहस्य तुम्हाला नक्कीच माहित नसेल. तुम्हाला माहितेय का संसद भवनात लावलेले सर्व पंखे उलटे आहेत? हे पंखे उलटे का आहेत याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का? आज आपण याच बद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग…
संसद भवनाची निर्मिती झाली तेव्हा त्याचा घुमट खूप उंच बांधण्यात आला होता. आता संसद भवनाची रचना पाहता इमारतीच्या सेंट्रल हॉलचा घुमट भवनाच्या मध्यभागी येतो.
इथे आधी छताचे पंखे बसविण्याचा प्रयत्न झाला होता. घुमटाच्या उंचीमुळे त्यावर छताचा पंखा बसवणे फार कठीण होते. हॉलमध्ये लांबलचक काठी लावून त्यावर पंखे लावण्याचा प्रयत्न झाला, पण हा प्रयत्नही अयशस्वी ठरला.
यानंतर एक युक्ती लावण्यात आली, जी आजतागायत सुरू आहे. प्रत्यक्षात सभागृहात वेगवेगळ्या ठिकाणी खांब बसवून मग त्यावर पंख उलटे लावण्यात आले.
पंख उलटे ठेवण्यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सभागृहातील पंख्याची हवा हॉलच्या कानाकोपऱ्यात गेली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही देशाच्या संसद भवनात अजूनही उलटे पंखे आहेत.