आता आपल्याला खूप मॉडर्न गोष्टी ऐकू येतात. कधी कुणाचा एक्स बॉयफ्रेंड प्रेझेन्ट बॉयफ्रेंडला भेटतो. कधी एक्स नवरा प्रेझेन्ट नवऱ्याला भेटतो एका महिलेने तिच्या बॉयफ्रेंड आणि पती दोघांनाही डिनरसाठी बोलावल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर महिलेच्या बेडरूम आणि तिच्या किचनचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मात्र, या दरम्यान महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत.
ही घटना ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेने तिचा सध्याचा नवरा आणि तिचा माजी पती दोघांनाही डिनरसाठी बोलावले होते.
रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, महिलेचा माजी पती आता तिचा बॉयफ्रेंड बनला आहे. याआधी त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. या डिनरच्या वेळी महिलेच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही उपस्थित असल्याचे आढळून आले आहे.
याचा व्हिडिओही महिलेच्या मुलीने पोस्ट केला होता जो चुकून व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ नंतर डिलीट करण्यात आला. व्हिडिओमध्ये दोन जण जेवण बनवण्यात व्यस्त आहेत, एक माशांना सॉस लावतोय तर दुसरा भाजी कापत आहे.
जेवण तयार झाल्यावर सर्वांनी एकत्र बसून जेवल्याचेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यानंतर ती महिला बेडरूममधील आरामदायी खुर्चीवर बसली. या दोघांना नोकरीवर ठेवूया असं मुलीने गमतीने आपल्या आईला सांगितल्याचे व्हिडिओमध्ये ऐकवत आहे. यानंतर दोघांनी किचनची सर्व कामे आटोपली.
एक विशेष गोष्ट म्हणजे त्या महिलेने जेवण बनवले नाही तर दोघांनीही जेवण बनवले. मात्र, या अहवालात महिलेच्या लग्नाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. जेव्हा हा आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांची मतं वेगवेगळी होती. काही लोक या कुटुंबाचं कौतुक करताना दिसले, तर काहींनी यावर टीका केली.