मुंबई: सगळं प्रेम एकीकडे आणि लोकांचं कुत्र्यावर असणारं प्रेम एकीकडे! होय. डॉग लव्हर्सला काय तोड नाही. त्यांच्या इतकं प्रेम तर एखादी व्यक्ती सुद्धा कोणत्या व्यक्तीवर करत नसेल. बरेचदा तर ही डॉग लव्हर्स असणारी कॅटेगिरी सोशल मीडियावरच एकमेकांना भिडते. कुत्र्यावर असणारं इतकं प्रेम त्यांना कधी कधी सगळ्या हद्दी पार करायला लावतं. आता तुम्ही म्हणाल छे छे! असं कसं? कुत्र्यांसाठी कोण का भांडेल? पण हे होतंय. माझ्या कुत्र्यालाही कुत्रा म्हणू नका त्याच्या नावाने हाक मारा असं म्हणणारी देखील लोकं आता अस्तित्वात आहेत. कुत्रप्रेम असणारी लोकं आपल्या कुत्र्याला अगदी बांधून ठेवायला सुद्धा नाहीच म्हणतात. मागे एक व्हिडीओ वायरल झाला होता ज्यात एक कुत्रा एका लहान मुलाला लिफ्ट मध्ये चावतो. आठवतोय? असाच एक लिफ्टमधला व्हिडीओ पुन्हा समोर आलाय. ज्यात कुत्रं घेऊन लिफ्ट मध्ये असणारी महिला इतर लोकांशी वाद घालतेय.
झालं असं की एका लिफ्ट मध्ये एक महिला आपल्या कुत्र्याला घेऊन गेली. तिथे असणारं एक कपल तिला म्हणालं की जी जाळी कुत्र्याच्या गळ्यात आहे ती तुम्ही त्याच्या तोंडाला बांधा म्हणजे ते कुत्रं चावणार नाही. कुत्रं घेऊन उभी असणारी महिला हे करायला तयार नव्हती. तिने कुत्र्याच्या तोंडाला जाळी लावायला नकार दिला. याच मुद्द्यावरून वाद सुरु झाला. यात जोडप्या मधील पुरुष त्या कुत्र्यासोबतच्या महिलेला म्हणाला, “कशी बाई आहे गं तु?” तर त्यावर ती महिला म्हणाली, “तुझ्या बायको पेक्षा तर नक्कीच चांगली आहे.” या वाक्यावरून लोकांनी या महिलेला प्रचंड ट्रोल केलंय.
लिफ्ट में डॉग लेकर चढ़ी इस महिला को सिर्फ मास्क पहनाने के लिए बोला गया, जो डॉग के गले में था. ये मास्क नहीं पहनाने पर अड़ गई और बदतमीज़ी भी करने लगी. लोगों का ऐसा रवैया सोचने पर मजबूर कर देता है कि हम कैसे समाज में जी रहे हैं. घटना Noida 137 Logix society की है.@noida_authority pic.twitter.com/4LEWM0b8u0
— Arzoo Sai (@arzoosai) July 6, 2023
महिलेचं कुत्रं प्रेम सुद्धा इतकं आहे की कमेंट बॉक्समध्ये लोकांनी काय बरोबर आणि काय चूक हेच सांगायला सुरुवात केलीय. त्या जोडप्यामध्ये ती महिला गरोदर असल्यामुळे लोकांनी असंही म्हटलं की, “काय फरक पडला असता गळ्यातली जाळी तोंडाला लावली असती तर? त्या महिलेला तो कुत्रा चावला असता तर किती इंजेक्शन लावावे लागले असते.”