मुंबई: तुम्ही जगलिंग पाहिलंय? हुला हुपिंग? डान्स? हे सगळं कधी तुम्ही एकत्र पाहिलंय का? म्हणजे एखादा माणूस एकदम बेस्ट जगलिंग करू शकतो. एखादा एकदम भारी हुला हुपिंग करू शकतो. तर कुणी एकदम बेस्ट डान्स करू शकतो. हे सगळं आपण वेगवेगळं पाहिलेलं आहे. पण कधी एकत्र पाहिलंय का? तुम्हाला जर आम्ही सांगितलं की जगलिंग, हुला हुपिंग, डान्स हे सगळं एखादी महिला एकत्र करू शकते तर? त्याहीपेक्षा हे सगळं ती महिला साडी नेसून करत असेल तर? आहे ना इंटरेस्टिंग? होय एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक महिला साडी नेसून हे टॅलेंट दाखवतेय.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ बघा. ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून ही कोटेश्वरी एम. के. स्वतः वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. ती ऑल राऊंडर आहे. @koteswari_kannan_official या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ बघा, तिच्या हातात बॉल्स आहेत, कंबरेला हुला हूप आहे. आधी ती ते बॉल्स हाताने खेळवते, ती जगलिंग करते. त्यानंतर ते बॉल्स फेकून देते आणि हुला हूप करते हे करत असतानाच ती डान्स सुद्धा करतेय. हा व्हिडीओ बघून तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल.
पिवळ्या रंगाची साडी नेसून, केस चापूनचोपून बांधून ही महिला आपलं टॅलेंट दाखवते. हुला हुपिंग पँट शर्ट, टॉप जीन्स घालून करणेच किती अवघड असते तर साडी नेसून हे किती अवघड असेल नाही का? एका मागे एक असे वेगवेगळे टॅलेंट ही महिला दाखवते. जगलिंग करताना लोकांचा नेहमी गोंधळ होतो पण ही महिला बॉल्स घेऊन जगलिंग करतेय आणि तेही न गोंधळता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.