एका तरुणीनं टिकटॉक व्हिडीओतून (TikTok Video) एक अजब खुलासा केला आहे. फक्त एका माणसासोबत Text SMS ने प्रेमाचं चॅटिंग (Love Chatting) करुन तरुणी मालामाल झाली आहे. दर महिन्याला जवळपास दीड लाख रुपयांची घसघशीत कमाई एका तरुणीनं केली आहे. तीन वर्ष या तरुणीनं फक्त एसएमएस पाठवून लाखो रुपये महिन्याला कमावले आहेत. व्हिडीओ जारी करत तरुणीनं याबाबत खुलासा केला आहे. या तरुणीनं पोस्ट केलेला व्हिडीओ आतापर्यंत सात मिलियनपेक्षा जास्त लोक पाहून झाले आहेत. कमाईचं हे अजब माध्यम पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. फक्त मेसेज पाठवण्याचे एकजण या तरुणीला एवढे लाखो रुपये देत होता, हे ऐकून काहीसं अजब वाटत असलं, तरी खरं आहे! मिरर युकेनं याबाबतचं वृत्त दिलंय. या तरुणीचं नाव बेली हंटर (Bailey Hunter) असं असून ही तरुणी एका हॉटेलमध्ये काम करत होती. एका गर्भश्रीमंत ग्राहकाशी हॉटेलमध्ये तिची भेट झाली. त्यानंतर या ग्राहकानं बेली हंटरला टीप दिली होती. टीप देताना आपला कॉन्टॅक्ट नंबरही बेलीला दिला होता. टीप दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी बेलीनं सगळ्यात आधी या माणसाला Text SMS केला. आणि त्यानंतर इथूनच चॅटिंगचा सिलसिला सुरु झाला होता.
@xbaileyhunterया टिकटॉक अकाऊंटवर तरुणीनं आपल्या कमाईबाबतचा मोठा खुलासा केला आहे. व्हिडीओ शेअर करत या तरुणीनं एसएमएसद्वारे आपण लाखो रुपये कमावल्याचं म्हटलं आहे. बफेलो वाईल्ड विंग्स नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये बेली हंटर काम करत होती. त्यावेळी एक ग्राहक त्याच्यापेक्षा कमी वयाच्या एका तरुणीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आला होता. बेलीनं या तरुणाला शुगर डॅडी असं म्हटलं आहे. डिनर झाल्यानंतर बिलापेक्षा जास्त रक्कम या ग्राहकानं बेलीला टीपमध्ये दिली होती.
2900 रुपये बिल झालं होतं. पण दिल दरीया असलेल्या या ग्राहकानं बेलीला 7400 रुपये इतकी टीप दिली. सोबतच आपलं कार्डही त्यानं बेली हंटरला दिलं. जेव्हा कार्डवर असलेल्या नंबरवर बेलीनं आभार मानण्यासाठी एसएमएस केला. तेव्हा रिप्लायमध्ये या भल्या माणसानं तिला तू टीपसाठी लायक असून तू आम्हाला पुन्हा केव्हा डिनर सर्व्ह करणार आहेस, असा प्रश्न केला. तसंच जेव्हा तू डिनर सर्व्ह करणार असशील, तेव्हा मी पुन्हा येईल, असंही म्हटलं.
इथूनच या दोघांची बातचीत वाढली. यानंतर जास्त पैसे कमावण्याच्या हेतूनं त्या दोघांमध्ये संवादही वाढत गेला. एका मैसेजिंग ऍपवर ते दोघं दररोज बोलू लागले. यानंतर मैत्रीत गप्पा मारणाऱ्या या दोघांमध्ये जवळीक वाढली. यानंतर मेसेज करण्यासाठी हा दर्यादील माणूस बेनीला पैसेही देऊ लागला होता. अनेकदा या माणसानं बेनीला आर्थिक मदत केली.
बेलीनं जेव्हा आपल्या आर्थिक स्थितीबद्दल या माणसाला सांगितलं. तेव्हा त्यानं बेनीला न सांगताच आर्थिक मदत करण्याच्या हेतून वरचेवर पैसे पाठवायला सुरुवात केली. फक्त TEXT SMSच्या बदल्यात हा माणूस बेनीला मदत करत होता, असा दावा तरुणीनं आपल्या व्हिडीओतून केला आहे.
Viral Video : मिठू मिठू नाही, कडू कडू बोलतोय हा पोपट! मग मुलीनंही चांगलंच झापलं..!
Ramp Walk असाही! मावळात भरला बैलांचा भव्य रॅम्प वॉक; पाहा, कोण जिंकलं..?
बाप रे..! 14 फुटांच्या अजगरासह 100हून अधिक सापांनी घेरलं, काय झालं त्या व्यक्तीचं?