एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढायला गेल्या गावाकडच्या दोन महिला, हसू नाही येणार वाईट वाटेल Video Viral

| Updated on: Oct 15, 2023 | 2:39 PM

जेव्हा पुढची महिला एस्केलेटरवर उभी राहते तेव्हा मागची महिला तिला घाबरून पकडते. ती वयस्कर असल्यानं ती इतकी घाबरते की ती पुढच्या महिलेला पूर्ण ताकदीने पकडते आणि या सगळ्या गोंधळात त्या दोघी खाली पडतात.

एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढायला गेल्या गावाकडच्या दोन महिला, हसू नाही येणार वाईट वाटेल Video Viral
escalator
Follow us on

मुंबई: आजकाल कुठेही गेलं अगदी रेल्वे स्टेशन पासून ते मॉल पर्यंत सगळीकडे एस्केलेटर आहे. या एस्केलेटरची एक वेगळीच मजा असते. तुम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या एस्केलेटर वरून गेला होतात तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्हाला भीती वाटली का? मग तुम्ही कसं सांभाळलं स्वतःला? आठवतंय? जे लोक शहरात राहतात त्यांना एस्केलेटर वर चढायची संधी जरा लवकर मिळाली पण जे लोक गावात राहतात त्यांना ही संधी उशिरा मिळाली. आजही काही लोक अशी आहेत की ज्यांना एस्केलेटर नवीन आहे. आता हा व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये गावाकडून आलेल्या दोन महिला आहेत ज्या पहिल्यांदा एस्केलेटर वर चढल्यात. हा व्हिडीओ बघताना या व्हिडीओची मजा घ्यायला हवी का? की त्या महिलांना कुणी मदत केली नाही म्हणून वाईट वाटून घ्यायला हवं? असा प्रश्न पडतो.

हा व्हिडीओ बघा

या व्हिडीओ मध्ये एका मॉल मधलं एस्केलेटर दिसेल. या एस्केलेटरवर दोन गावाकडच्या महिला चढायचा प्रयत्न करतायत. या दोन महिला एकामागोमाग एक चढतायत, पुढची महिला कशीबशी त्या एस्केलेटरवर चढते आणि मागची महिला पुढच्या महिलेच्या पदराला धरून कशीबशी त्या एस्केलेटरवर उभी राहते. खरं तर यातली जी पुढे असणारी महिला आहे ती तरुण आहे आणि मागे असणारी महिला आहे वयस्कर आहे. जेव्हा पुढची महिला एस्केलेटरवर उभी राहते तेव्हा मागची महिला तिला घाबरून पकडते. ती वयस्कर असल्यानं ती इतकी घाबरते की ती पुढच्या महिलेला पूर्ण ताकदीने पकडते आणि या सगळ्या गोंधळात त्या दोघी खाली पडतात.

व्हिडीओ बघून कधीच हसू येणार नाही

हा व्हिडीओ बघताना प्रश्न पडतो की या महिलांची कुणी मदत करायला का नाही आलं? या महिलांनी कुणाची मदत का नाही घेतली? कदाचित गावाकडच्या असल्यामुळे त्यांना मदत मागताना लाज वाटली असावी पण जेव्हा कुणी एस्केलेटरवर चढताना घाबरत असेल तेव्हा आजूबाजूची लोकं मदत करायला मागे का हटतात? हे सगळे प्रश्न पडणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओ बघून कधीच हसू येणार नाही. त्याला उलट प्रश्न पडेल की कुणी मदत का नाही केली. “तुम्ही बघू शकता ना कुणीच मदत करत नाहीये, गावाकडच्या लोकांसोबत असं सगळं होतं आणि कुणी काही करू शकत नाही” असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय.