32 वर्षीय समंथा रम्सडेल सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. कारण ती जगातील सर्वात मोठ्या तोंडाची तरुणी म्हणून व्हायरल झाली होती. सामन्था रम्सडेल ने २०२१ मध्ये मोठ्या तोंडाची पहिली महिला म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे.
समंथाचे तोंड ६.५२ सेंमी रुंद आहे. सफरचंद, संत्री, मोठ्या कुकीज, चॉकलेट बार आणि बर्गर न कापता तसंच समंथा खाऊ शकते. याचाच एक व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
समन्था म्हणाली की, कुटुंबातील अनेक लोकांचे तोंड असे वेगळे आहे. समंथाच्या तोंडाचा आकार तिच्या बालपणीच्या चित्रांमध्ये पाहायला मिळतो. समन्था सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते, ज्यात तिच्या तोंडाचा आकार दिसून येतो.
ती म्हणते की, लहान असल्यापासून तिच्या हसण्यावरून तिची खिल्ली उडवली जायची.
ते फिट होईल का? गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.