डोकेबाज पोरगी… 20 तरुणांना पटवलं; फक्त एकच गोष्ट मागितली… व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल

| Updated on: Jul 09, 2024 | 8:46 PM

लोक जगण्यासाठी आणि आपले छंद पूर्ण करण्यासाठी कधी काय शक्कल लढवतील ते सांगता येणार नाही. शॉर्टकटमध्ये जास्तीत जास्त यश कसे मिळवायचे आणि प्रश्न कसे सोडवायचे याचा विचार करताना आजची पिढी दिसते. जियाओली ही तरुणी त्यापैकीच एक. अत्यंत गरीब घरातील. चीनची रहिवाशी. एक दिवस तिच्या मनात आलं आणि... नंतर जे घडलं त्याने सर्वच आश्चर्यचकीत झाले.

डोकेबाज पोरगी... 20 तरुणांना पटवलं; फक्त एकच गोष्ट मागितली... व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल
woman in China
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोशल मीडियात अनेक गोष्टी व्हायरल होतात. काही माहीत असलेल्या असतात तर काही माहीत नसलेल्या. तर काही आश्चर्याचा धक्का देणाऱ्या असतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चीनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या बाबतची ही माहिती आहे. या डोकेबाज पोरीने एक दोन नव्हे तर 20 तरुणांना पटवलं. त्यांच्याकडून एकच गोष्ट मागितली. तिच्या या बॉयफ्रेंडनी तिला ही गोष्ट दिली आहे. हे सर्व फोन घेऊन तिने त्यानंतर जे काही केलं त्याचीच सोशल मीडियात चर्चा होत आहे.

इंस्टाग्राम अकाउंट @tech_grammm वर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओ 1 कोटी 71 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 1 लाख 60 हजार यूजर्सनी तो शेअर केला आहे. या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. या तरुणीने असं काय केलं की तिचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तर, या तरुणीला घर खरेदी करायचे होते. त्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने शक्कल लढवली. 20 तरुणांना पटवलं. त्यांच्याकडून फक्त गिफ्ट म्हणून आयफोन मागितला आणि हे सर्व फोन तिने विकून टाकले. त्यातून आलेल्या पैशात तिने घर खरेदी केलं. त्यामुळेच या डोकेबाज पोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

कमेंट्सचा पाऊस

या व्हिडीओवर विविध कमेंट्स आल्या आहेत. पलक नावाच्या एका तरुणाने कमेंट केली आहे. तिने तिचं काम केलं. तिला तर केवळ एकच फोन हवा होता. इतर 19 फोनचं ती करणार काय?, असा सवाल पलकने केला आहे. तर मला चीनमधील स्वस्तातील घरे खूप आवडतात. पण मी तिच्या या कृतीचं समर्थन करत नाही, असं अद्विती नावाच्या तरुणीने म्हटलं आहे. आता आपल्या देशातील तरुणींनीही या चायनीज पोरींकडून चालबाजी शिकली पाहिजे, असं शेख अब्दुलचं म्हणणं आहे.

 

कुणी केला भांडाफोड?

पण ही व्हायरल पोस्ट खरीच आहे का? असा प्रश्न पडला तेव्हा गुगलवर सर्च करण्यात आलं. तेव्हा ही पोस्ट भलेही आता इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली असेल. पण ही खरी घटना असून ती 2016मधील आहे. या घटनेचा भांडाफोड चीनचा एक ब्लॉगर प्राऊड किआओबा (Proud Qiaoba) याने केला आहे. बॉयफ्रेंडला गंडवणाऱ्या या तरुणीचं नाव जियाओली आहे. ती किआओबासोबत काम करते. तिनेच या ब्लॉगरला तिच्या फसवणुकीची कहाणी सांगितली होती. माझ्या 20 मित्रांकडून मी 20 आयफोन गिफ्ट घेतले. त्यानंतर मला घराला जेवढी रक्कम लागते तेवढ्या किंमतीत हे 20 आयफोन विकले, असं तिने किआओबाला सांगितलं होतं.

गरीबा घरची पोर

जियाओलीने 20 आयफोन रिसायक्लिंग प्लांटला 17,815 डॉलर म्हणजे 14 लाख 87 हजार 93 रुपयांना विकले. तो पैसा तिने घर खरेदी करण्यासाठी वापरला हे ऐकून मला आश्चर्य वाटलं, असं किआओबा म्हणाला. जियाओली ही गरीब कुटुंबातील मुलगी आहे. त्यामुळेच तिला घर खरेदी करण्यासाठी पैसा कमवण्याकरता विविध मार्ग शोधावे लागले. ऑफिसमध्ये आता प्रत्येकजण त्यावरच भाष्य करत आहे. मात्र, आता जियाओलीचा हा कारनामा सार्वजनिक झाला आहे. त्यामुळे तिला मोबाईल देणाऱ्या तिच्या प्रियकरांची काय अवस्था झाली असेल याचा विचारच नको करायला.