मुंबई: समजा तुम्ही ऑनलाइन एक गोष्ट मागविली आणि त्याबदल्यात दुसरीच आली तर? आजकाल ऑनलाइन शॉपिंगचं प्रचंड फॅड आहे. लोकं उठता बसता आपल्याला हवं ते सगळंच ऑनलाइन मागवतात. ऑनलाइन शॉपिंग लोकांना सगळ्यात सोपी वाटते. पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर करायचे आणि ऑर्डर लगेच 2-4 दिवसात घर पोहोच! या फॅडमुळे लोकांना दुकानात जाऊन शॉपिंग करायचा कंटाळा यायला लागलाय. दुकानात ज्या गोष्टी मिळतात त्याच लोकांना ऑनलाइन मिळतात. पण कुठलाही बिझनेस वाढायला लागला की त्यासोबत फसवणूक सुद्धा हळू हळू व्हायला लागते. अशीच एक घटना घडलीये एका इन्फ्लुएन्सर सोबत. ऑनलाइन ब्रेसलेट ऑर्डर केल्यावर तिला पॉंड्सची रिकामी डब्बी मिळालीये.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ऐश्वर्या खजुरिया असं तिचं नाव आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता हे पार्सल परत करण्याची लाज वाटत असल्याचे तिने लिहिले आहे. डिलिव्हरी वाला हे पाहून काय विचार करेल? मीशोकडून 200 रुपयांचे दागिने मागवले होते, मात्र पार्सलमध्ये वापरलेल्या पॉंड्स क्रिमचा रिकामा डबा आलाय.
तो डबा सील केला असता तरी काहीतरी विचार करता आला असता पण तोही रिकामाच निघाल्याचे तिने या व्हिडिओमध्ये सांगितलंय. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये तिने तिला आलेल्या क्रीमचा बॉक्सही उघडला, जो डब्बा वापरल्याचे स्पष्ट दिसून येतंय. इतकंच नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून तिने सांगितलं की, आधी हेअर क्लिपच्या जागी टमी टकर आलं होतं असं ती सांगते.
व्हिडिओमध्ये खजुरियाने काळे ब्रेसलेट विकत घेतले होते पण आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोक प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने लिहिले की, ‘मीशो आता स्कॅम गुरू झाला आहे. तर काहींनी सांगितले की, ऑनलाइन शॉपिंग नेहमीच महाग असते