ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात लोक घरबसल्या वस्तू मागवणं पसंत करू लागले आहेत. फळे-भाज्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दागिन्यांपर्यंत लोक ऑनलाइन ऑर्डर देत आहेत. तथापि, ऑनलाइन शॉपिंगचे फायदे आहेत आणि तोटे देखील आहेत. अनेक लोकांची तक्रार असते की त्यांनी काहीतरी मागवले होते आणि त्यांना काहीतरी वेगळेच मिळाले. फोनऐवजी साबण आणि लॅपटॉपऐवजी पुठ्ठ्यासारख्या घटना तुम्हाला माहिती असतील. आता एका महिलेने असाच एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या महिलेने ॲमेझॉनवरून 12 हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक टूथब्रश मागवला होता, मात्र पॅकेटमधून जे बाहेर आले ते पाहून ती बेशुद्ध पडली असावी.
ट्विटरवर @badassflowerbby नावाच्या हँडलवरील एका महिला युजरने आपला कटू अनुभव लोकांसोबत शेअर केला आणि लिहिले की, ‘माझ्या आईने महागड्या टूथब्रशसाठी कॅश ऑन डिलिव्हरी दिली. पण पाकीट उघडले तेव्हा आतून MDH चाट मसाल्याचे चार डबे बाहेर आले.
या महिलेने पुढील ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘डिस्काउंट पाहून लोक वस्तू खरेदी करण्यास उत्सुक असतात. आता तुम्ही असा युक्तिवाद करू शकता की ऑर्डर देण्यापूर्वी रिव्ह्यू वाचायला हवा, पण माझा प्रश्न असा आहे की किती लोक असे करतात.”
या महिलेने ॲमेझॉनला प्रश्न विचारला आहे की, “ते आपल्या वेबसाइटवर फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांची यादी वाढत चालली आहे, जे वारंवार लोकांची फसवणूक करत आहेत.”
Dear @amazonIN, why haven’t you removed a seller who’s been scamming buyers for over a year? My mom ordered an Oral-B electric toothbrush worth ₹12k, and received 4 boxes of MDH Chat Masala instead! Turns out seller MEPLTD has done this to dozens of customers since Jan 2022. pic.twitter.com/vvgf1apA38
— N?? (@badassflowerbby) February 12, 2023
या महिलेने आपल्या ट्विटसोबत युजर रिव्ह्यूजचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत, ज्यात अनेकांनी टूथब्रशऐवजी मसाल्याची पाकिटे मिळत असल्याची तक्रार केली आहे. स्क्रीनशॉटनुसार, युजर्सची तक्रार आहे की त्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही.
महिलेने सांगितले की, पैसे देण्यापूर्वी तिच्या आईने डिलिव्हरी एजंटसमोर पॅकेट उघडले. या महिलेची पोस्ट आतापर्यंत 66 हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. तर अनेकांनी कमेंट आणि शेअर केले आहेत.