अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. काही कारणे आश्चर्यकारक आहेत तर काही कारणे मजेदार आहेत. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ कॅनडामधील आहे. व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाल्यानंतर यूजर्सनी अश्चर्य व्यक्त करत संबंधित व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. एक महिला कॅनडामधील (Canada) गोठलेल्या नदीत (River) गाडी चालवत होती. त्याचवेळी या गाडीचा अपघात होतो. मात्र अपघात झाल्यानंतर देखील ही महिला या गाडीसोबत सेल्फी घेत आहे. हा व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या व्हिडीओमुळे ही महिला जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या महिलेने चक्क बुडत्या कारसोबत सेल्फी घेतला.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार ही महिला रविवारी दुपारी उपनगरातील मॅनोटिका येथील रिडो नदीत गाडी चालवत होती. याचदरम्यान त्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ही गाडी बर्फाच्या खाली असलेल्या पाण्यात बुडू लागली. मात्र अशाही अवस्थेमध्ये ही महिला गाडीच्या बोनेटवर चढून बुडत्या गाडीसोबत सेल्फी काढत होती. सेल्फीच्या नादात तीला आपली गाडी बुडू लागल्याचे देखील भान नव्हते. हा सर्व प्रकार पाहुन तेथील स्थानिक लोक या महिलेचे मदतीसाठी धावले.
स्थानिकांनी आपला जीव धोक्यात घालून या महिलेचे प्राण वाचवले. स्थानिकांच्या जागृततेबाबत पोलिसांनी नागरिकांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी ट्विट करत घटनेची माहिती दिली. तसेच स्थानिकांचे कौतुक देखील केले आहे. स्थानिकांनी आपला जीव धोक्यात घालून, मोठ्या धाडसाने या महिलेचे प्राण वाचवले असे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायर होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
This evening a car went through the ice in the south end of Ottawa. Thankfully no injuries and an amazing job by local residents saving the driver by using a kayak and quick safe thinking. Another reminder that “No Ice Is Safe Ice”. Please use extreme caution this winter season! pic.twitter.com/zpWdeyYzps
— MDT Ottawa Police (@MDTOttawaPolice) January 16, 2022
#ottnews pic.twitter.com/Y1FmrpUX5m
— 580 CFRA (@CFRAOttawa) January 17, 2022