मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडिओंना पाहून आपण हैराण होतो. सध्या तर यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर लाईक मिळवण्यासाठी आपल्या मुलाला रडवण्याचा आग्रह करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी या महिलेला चांगलंच ट्रोल करत आहेत. jordan cheyenne असं या तीस वर्षीय महिलेचं नाव असून ती मूळची अमेरिकेची आहे. (women delete her youtube channel who is asking her boy to cry for like and subscribe video went viral on social media)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील महिला यूट्यूबर आहे. तसेच ती इंस्टाग्रामवरही सक्रिय असते. या महिलेचे यूट्यूबवर लाखोंनी सबस्क्रायबर आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या महिलेचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये महिला आपल्या मुलासोबत कारमध्ये बसली होती. तसेच ती आपल्या मुलाला रडण्याचा आग्रह करत होती. या महिलेचा हाच व्हिडिओ नंतर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी महिलेला चांगलेच सुनावले.
व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये महिला आमचा पाळीव कुत्रा आजारी असल्यामुळे आम्हाला दुःख झाले आहे, असे सांगत होती. लाईक आणि सबस्क्राईब मिळवण्यासाठी ही महिला सगळं काही नाटक करत होती. नंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर महिलेला आपले युट्युब तसेच इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करावे लागले. ट्रोलिंग वाढल्यामुळे महिलेने हा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ :
this is so DISTURBING what is wrong with mom vloggers omfg pic.twitter.com/krUjM5Sfit
— elle woods ♿︎ 24 (@artangeIII) September 8, 2021
दरम्यान, हा व्हिडिओ महिलेने आपल्या सोशल अकाउंट वरून डिलीट केलेला असला तरी सध्या तो विविध माध्यमातून व्हायरल होत आहे. jordan cheyenne या महिलेचा कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर बातम्या :
Video | कामावर असताना डोकं फिरलं, पठ्ठ्याने जेसीबीच्या मदतीने ट्रकचा केला चुराडा, व्हिडीओ व्हायरल
Video | पतीशी अनैतिक संबध असल्याचा संशय, महिलेची ऑफिसमध्ये जाऊन बहिणीला मारहाण
Electric Vehicles ना प्रोत्साहन देण्यासाठी निती आयोगाची ‘शून्य’ मोहीम#Shoonya #ShoonyaKiShuruat #NITIAayog #FutureofMobility
https://t.co/QRXJ5aXs0B— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
(women delete her youtube channel who is asking her boy to cry for like and subscribe video went viral on social media)