सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी लोक जिममध्ये जातात, पण काही वेळा काही गोष्टींवरून लोक एकमेकांशी भांडतात. जिमिंग करताना छोट्या छोट्या गोष्टींवर लोकांचा अहंकार दुखावला जातो आणि मग ते लगेच भांडायला लागतात. सध्या इंटरनेटवर एका जिमचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, ज्यात एका छोट्या गोष्टीवरून दोन महिला भिडल्यात. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की जिममध्ये महिलांमधील भांडणाचं कारण काय होतं? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जिमच्या उपकरणांमुळे दोन महिलांमध्ये भांडण सुरू होतं.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओत बघा, जिमच्या उपकरणावरून हाणामारी सुरू झालीये. खरं तर जिममधली एका उपकरणावर एक बाई बराच वेळ व्यायाम करत होती, तिच्या डाव्या बाजूला दुसरी स्त्री ते उपकरण रिकामं व्हायची वाट बघत होती.
दुसरी स्त्री व्यायामासाठी पुढे सरकताच अचानक मागून एक स्त्री येऊन तिला ढकलते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Kalesh Inside GYM for Smith Machine pic.twitter.com/KXy6v9UyWj
— r/Bahar Ke Kalesh (@Baharkekalesh) October 9, 2022
काळ्या शर्टात एक महिला तिला जिम उपकरण मिळावं यासाठी वाट पाहत उभी असते. दुसरी महिला आपला सेट संपवते.
दोघेही एकमेकांचे केस ओढू लागतात आणि मग या भांडणाला मोठं रूप येतं. इतर दोन महिला भांडण थांबवण्यासाठी पुढे येतात आणि त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिलीये.