प्रियदर्शनी ही लखनौची महिला, जिने एका कॅब ड्रायव्हरला रस्त्याच्या मधोमध मारहाण केली, हा व्हिडीओ सर्वांना आठवत असेल. त्यावेळी तो व्हिडीओ सोशल मीडियावर अशाप्रकारे व्हायरल झाला की, तो कुणी पाहिला असेल असा शोधून सापडणार नाही. पण आता पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिथं एक महिला कॅब ड्रायव्हरच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील पटेल नगरमधील आहे. 17 नोव्हेंबर रोजी ट्विटर यूजर आदित्य सिंगने हा व्हिडीओ शेअर केला होते. आतापर्यंत हा व्हिडिओ 6 हजार वेळा पाहिला गेला आहे. ( Women in Delhi slaps and punches cab driver viral video )
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्याच्या मधोमध एका कॅब ड्रायव्हरला थोबाडीत मारताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. त्या व्यक्तीने महिलेला मारण्यापासून रोखण्यासाठी काहीही केले नाही. आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीच्या बचावासाठी आले आणि त्यांनी त्या महिलेच्या अशा वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महिलेने एका पुरुषाला धमकावल्याचे पाहून तिथे उपस्थित लोकांनी घटनेचे रेकॉर्डिंग केलं. वाद झाल्यानंतर लोक जमा झाले, आणि त्यापैकी काहींनी महिलेला रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालण्यापासून रोखले पण काही उपयोग झाला नाही. व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे, लोकांनी पोलिसांना या महिलेवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.
व्हिडीओ पाहा:
Sad I had to see this! pic.twitter.com/HVGHvEMkPB
— Aditya Singh (@Aditya22rajpoot) November 17, 2021
प्रतिक्रिया देताना लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या, एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘पोलिसांनी या घटनेची स्वत:हून दखल घेऊन महिलेवर कायदेशीर कारवाई करावी. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘महिलेला एक धडा मिळाला पाहिजे, अजूनही या महिलेला तिची चूक समजली नाही, पोलिसांनी कारवाई करावी’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करा!’
काही महिन्यांपूर्वी लखनौची एक महिला, जिची नंतर प्रियदर्शनी म्हणून ओळख झाली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये ती एका कॅब ड्रायव्हरला मारहाण करताना दिसत आहे. प्रियदर्शिनीने दावा केला की कॅबने तिला धडक दिली आणि यामुळे ती नाराज झाली होती. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजवरुन ही महिला खोटं बोलत असल्याचं उघड झालं.
हेही पाहा: