मुंबई: इंटरनेट म्हटलं की त्यावर काहीतरी वेगळ दररोज पाहायला मिळतं. एखादा फोटो किंवा व्हिडीओ रातोरात इंटरनेटवर व्हायरल होतो आणि सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचतो. कधी-कधी हे व्हिडीओ मजेशीर असतात तर कधी कधी धक्कादायक. सध्याही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला गडबडीत कचऱ्याच्या जागी आपल्या बाळालाच डस्टबीनमध्ये फेकून येते.
या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या घराच्या दरवाजाकडे जाताना दिसत आहे. यावेळी तिच्या एका हातात बाळ आहे तर दुसऱ्या हातात कचऱ्याची पिशवी. व्हिडीओमध्ये ती महिला कचरा बाहेर फेकायला जात असल्याचं दिसतं आहे. पण जेव्हा ती महिला पुन्हा आत येते तेव्हा तिच्या हातात कचरा तसाच असतो पण बाळ गायब असतं. तिला ही गोष्ट कळताच ती धावत पुन्हा बाहेर जाते. कामाच्या गडबडीत आणि लक्ष नसल्यामुळे त्या महिलेने चूकन कचरा फेकायच्या ऐवजी बाळाला फेकल्याचा हा व्हीडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुळात बराच जुना आहे. पण आता हा पुन्हा व्हायरल होत असून अनेकजण यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत शिखर धवन (Shikhar Dhawan) याला टॅग केलं आहे आणि शिखर असंच करतो असंही लिहिलं आहे. ज्यावर धवनने रिप्लायमध्ये ‘मालक हात जोडतो, आएशा माझा जीव घेईल’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.
इतर बातम्या :
VIDEO : चष्मा घालून मिरवणारी चिमुकली आज्जीबाई, चिमुकलीचा व्हिडीओ पाहाल तर पोट धरून हसाल
(Women throw child in dustbin instead of garbage see Viral video)