नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : गुगल हे कर्मचाऱ्यांसाठी (Google Employees) स्वर्गापेक्षा कमी नाही. अनेक सोयी-सुविधा, कामाच्या तासांचे बंधन नाही. येथील वर्क कल्चर अनेकांसाठी स्वर्गीय सूख देणारे आहे. कर्मचाऱ्यांवर कामासाठी कुठलाही दबाव नसतो. ते हसत खेळत काम करतात. कदाचित तुमचे ऑफिस पण जोरदार असले. कार्यालय सोयी-सुविधांनी युक्त असेल. पण रोजचे 8 तास ही कमी पडत असतील. कारण अनेक कार्यालयात कामाचे मोठे बर्डन असते. दिवसभर अनेक जण काही शोधायचे असेल तर सर्वात अगोदर गुगल करतात. पण येथील एक कर्मचारी अवघे 2 दोन तास काम करुन कोट्यवधींचा पगार उचलतो. येथील वर्क कल्चर अनेकांसाठी स्वर्गीय सूख देणारे आहे. एका कर्मचाऱ्याची स्टोरी अशी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) सुद्धा कर्मचाऱ्याची ही कमाल पाहून चकीत झाला.
2 तासांत 5 लाख डॉलर
ट्विटरवर एका गुगल कर्मचाऱ्याची स्टोरी जोरदार व्हायरल होत आहे. गुगलमधील एक कर्मचारी दररोज केवळ 2 तास काम करतो. त्यासाठी कंपनी त्याला 500,000 डॉलर (4.1 कोटी रुपये) पगार देते. या व्हायरल ट्विटवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. युझर्स ही पोस्ट शेअर करत आहेत. सर्वांनाच यामुळे धक्का बसला आहे. इतक्या कमी वेळेत इतका पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्याची ही स्टोरी खूप व्हायरल झाली आहे.
सॅलरी ऐकून एलॉन मस्क धक्क्यात
हे ट्विट जोरदार व्हायरल झाले. ट्विटरचे मालक एलॉन मस्क पण या ट्विटवर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. या कर्मचाऱ्याला जोरदार पगार आहे. या ट्विटवर मस्कने मिश्किल प्रतिक्रिया दिली. मस्क म्हटला, “wow”
कोणी केली ही पोस्ट
ही पोस्ट @nearcyan या अधिकृत हँडलवरुन एका ट्विटर युझरने केली आहे. हा युझर गुगलमधील दोन कर्मचाऱ्यांसोबत जेवायला गेला होता. त्यावेळी या कर्मचाऱ्यांनी कोण किती तास काम करते, याची चर्चा केली. कोण कमी वेळेत काम करते, याची पण चर्चा रंगली. त्यातील एका व्यक्तीने त्याने प्रत्येक दिवशी सरासरी केवळ दोन तास काम करुन 500,000 डॉलर कमावल्याचे सांगितले.
अनेक बदलाची नांदी
ट्विटर ताब्यात घेतल्यापासून एलॉन मस्कने अनेक बदल केले. काही सेवांसाठी त्याने शुल्क आकारणी सुरु केली. त्यामुळे युझर नाराज झालेत. ब्लू टिकसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली. युझरला जास्त मॅसेज करायचे असेल तर ट्विटर ब्लू सर्व्हिसचे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागेल.