World Deadliest Female Drink Blood: तुम्ही सिनेमांमध्ये पाहिले असेल की, स्वत:ला तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी लोकांना रक्त प्यायला लावण्यासाठी स्त्रिया रक्त पितात. तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की, वास्तविक असे नाही, परंतु लोकांच्या मते 16 व्या शतकात अशी एक स्त्री होती जी जगातील आतापर्यंतची सर्वात क्रूर स्त्री मानली जाते. त्याने आपले तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी ६०० हून अधिक लोकांना ठार मारले होते आणि त्यांचे रक्त प्यायले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या (Guinness Book Of World Record) मते, तिला आतापर्यंतची सर्वात घातक महिला किलर मानलं गेलं आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, या हंगेरियन महिलेचं नाव काऊंटेस एलिझाबेथ बाथेरी (Elizabeth Bathory) असं होतं. तिचा जन्म 1560 मध्ये जमीनदारांच्या एका धनाढ्य कुटुंबात झाला. आजच्या लोवाकियातील केटीस कॅसलमध्ये ती आलिशान आयुष्य जगली होती. काउंटेसने स्वत:ला ‘काउंटेस ड्रॅकुला’ (Countess Dracula) असे टोपणनाव दिले होते. तिने एका शेतकऱ्याच्या मुलींना पळवून आणलं, त्यांना तुरुंगात डांबलं आणि त्यांची हत्या केली होती. बाथरी फक्त एवढ्यावरच थांबली नाही. पीडितांना त्रास देण्यासाठी तिने क्रूर पद्धतींचा वापर केला. ती त्या मुलींच्या नखांखाली पिन लावायची. त्यांचे स्तन, बोटं आणि गुप्तांग कापायची आणि थंडीत गोठवायला सोडायची.
मात्र, त्यांनी केवळ शेतकऱ्यांवर आणि गरिबांच्या मुलींवरच अत्याचार केले नाहीत. तसेच श्रीमंतांच्या मुलींची हत्या केली. असे म्हटले जाते की, पीडितांना ठार मारल्यानंतर बाथरी त्यांच्या रक्ताने आंघोळ करायची. तिचा असा समज होता की अशाने तिचं तारुण्य टिकून राहू शकतं. पीडितांना ठार मारल्यानंतर ती त्यांचं रक्त सुद्धा पीत असे. कशासाठी? तारुण्य टिकवण्यासाठी.
बाथरी बऱ्यापैकी श्रीमंत होती. श्रीमंतीमुळे आणि अन्य काही कारणांमुळे तिच्या पर्यंत पोहचणं आणि तिला अटक करणं शक्य नव्हतं कारण बाथरी खूप पॉवरफुल होती. 1590 ते 1610 या काळात त्याने अनेक हत्या केल्या. अखेर डिसेंबर १६१० मध्ये या काउंटेस ड्रॅकुलाला तिच्या चार सर्वात विश्वासू नोकरांसह अटक करण्यात आली.
बाथरी वर 80 मुलींची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र, काउंटेसची डायरी पाहिल्याचा दावा करणाऱ्या एका साक्षीदाराने ही संख्या प्रत्यक्षात 650 असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काउंटेसला नजरकैदेत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि वयाच्या 54 व्या वर्षी 1614 मध्ये तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर बाथरीच्या शरीराचे अवशेष सापडले नाहीत. तिला कुठे दफन करण्यात आलं, तिचे अवशेष कुठे आहेत याबद्दल कुणालाही कल्पना नाही. महालाच्या मैदानात मध्यभागी बाथरीला दफन करण्यात आलं होतं असं काहींचं म्हणणं आहे.