अननस हा व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मॅंगनीज आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. विशेषतः थंडीच्या मोसमात आरोग्यासाठी हे उत्तम फळ आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, याचा एक प्रकार आहे जो खूप महाग आहे? हेलिगन अननस (Heligan pineapple) बीबीसीच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये ज्या बागेमध्ये हे फळ उगवले जाते त्या बागेच्या नावावरून हेलिगन अननसांचे नाव देण्यात आले आहे. या अननसाची किंमत सुमारे 1 हजार पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) इतकी आहे. एक पीक तयार करण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो.
एका वेबसाइटनुसार,1819 मध्ये ते ब्रिटनमध्ये आणण्यात आले. बागायतदारांच्या लक्षात आले की, देशाचे हवामान अननस लागवडीसाठी चांगले नाही.
म्हणून त्यांनी एक युक्ती केली – विशिष्ट लाकडी खड्ड्यांच्या आकाराच्या भांड्यांची रचना केली गेली. त्याचे पोषण करण्यासाठी खत, बॅकअप हीटर जोडलं गेलं.
रिपोर्टनुसार, हेलिगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अननस हे खूप मेहनतीचे काम आहे. अननस, कंपोस्टचा वाहतूक खर्च, अननसाचे खड्डे आणि इतर लहान तुकडे यांची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ यामुळे प्रत्येक अननसाची किंमत 1 हजार पौंड इतकी आहे.”
हेलिगन वेबसाइटनुसार राणी एलिझाबेथ द्वितीय यांना व्हिक्टोरियन ग्रीनहाऊसमध्ये पिकवलेला दुसरा अननस भेट म्हणून देण्यात आला. या फळाचा लिलाव झाल्यास प्रत्येक अननसाची किंमत १० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले.