सध्या सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे, जिथे जे काहीही अपलोड केले जाते, ते व्हायरल होणे निश्चितच आहे. रोज कुणी ना कुणीतरी फेमस झाल्याचं पाहायला मिळतं.अनेकांचे नशीब रातोरात यामुळेच बदलले आणि ते सुपरस्टार बनले. तुम्हा सर्वांना आठवत असेल की, गेल्या काही दिवसांत सहदेव, रानू मंडल, बाबा जॅक्सन सारखे सामान्य लोक रातोरात स्टार झाले होते. त्यांच्या व्हिडिओंमुळे हे लोक इतके व्हायरल झाले की, त्यांची ओळख एखाद्या सेलिब्रिटीसारखी होऊ लागली. (Yohani De Silva Manike Mage hithe song sung by Desi uncle in unique style google trends video viral)
सध्या एका ‘काकां’चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते देसी स्टाइलमध्ये श्रीलंकन हिट गाणे ‘मानिक मागे हिते’ गाताना दिसत आहे. जेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तेव्हापासून बहुतेक लोक म्हणतात की – रानू मंडलनंतर आता ही नवीन प्रतिभा आहे. व्हिडिओमध्ये ते ज्या पद्धतीने गाणे गाताहेत ते पाहून कुणालाच त्याच्या हसू येईल. प्रत्येकाला हा व्हिडिओ इतका मजेदार वाटत आहे.
व्हिडीओ पाहा:
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘giedde’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
याचं मूळ गाणे श्रीलंकन गायिका योहानी डी सिल्वा यांनी गायलं आहे. आजच्या काळात हे गाणे तुम्हाला इन्स्टाग्रामच्या प्रत्येक रीलमध्ये ऐकायला मिळेल. हे गाणे श्रीलंकेपेक्षा भारतात जास्त व्हायरल झाले असून आता सगळेच या गाण्याचे बोल गुणगुणत आहेत.
हेही पाहा: