मुंबई : आजकालची तरुणाई कधी काय करेल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर तर हे तरुण चांगलेच सक्रिय असतात. वेगवेगळ्या करामती करुन ते सोशल मीडियावर लाखो लोकांचे मनोरंजन करतात. सध्या अशाच काही तरुण-तरुणींचा धमाल उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे तरुण-तरुणी बॉलिवूडचा बादहशा शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या तरुणांची संख्या चांगलीच मोठी आहे. यातील काही तरुण हे प्रँक व्हिडीओ, विनोदी व्हिडीओ तयार करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. पण या व्हिडीओतील तरुण-तरुणींनी शाहरुख खानच्या प्रशिद्ध अशा छैय्या-छैय्या या गाण्यावर डान्स केलाय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. गाण्याच्या तालावर ठेका धरत तरुणांनी केलेला डान्स नेटकऱ्यांचा मूड फ्रेश करत आहे.
पाहा व्हिडीओ :
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका कॅम्पेनिंग व्हॅनच्या आजूबाजूला तसेच व्हॅनवर जाऊन ही तरुण मंडळी डान्स करत आहेत. मूळ गाण्यात शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांनी सोबत चालत्या रेल्वेवर डान्स केलेला आहे. पण या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणी थांबलेल्या कॅम्पेनिंग व्हॅनवर डान्स करत आहेत. या तरुण मंडळींनी धररेला ठेका पाहून नेटकरीसुद्धा चांगलेच फ्रेश होत आहेत.
नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ उर्जेने ओतप्रोत असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ आम्हाला खूपच आवडला असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलीय. सध्या त्याला इन्स्टाग्रामवर jainil_dreamtodance या अकाऊंटवर पाहता येईल. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल 55 हजार लोकांनी लाईक केले आहे.
इतर बातम्या :