भोपाळ: भारतात कधी काय होईल याचा नेम नाही. इथे रोज एक व्हिडीओ व्हायरल होतो. कधी कुणी गाणं म्हणत असतं तर कधी कुणी डान्स करत असतं. सोशल मिडीयावर धुमाकूळ चालूच असतो. प्राण्यांचे, पक्ष्यांचे, लहान मुलांचे व्हिडीओ तर सगळ्यांनाच आवडतात. हे सगळे व्हिडीओ एकीकडे आणि झोमॅटोचे व्हिडीओ एकीकडे. झोमॅटोच्या व्हिडीओचा फॅन बेस वेगळा आहे. यात त्यांच्या डिलीव्हरी बॉयचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. आता हाच व्हिडीओ बघा हा व्हिडीओ चक्क झोमॅटोच्या डिलीव्हरी गर्लचा आहे. हा व्हिडीओ बघून भल्या भल्यांना बसलाय धक्का.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी बाईकवर झोमॅटोची डिलीव्हरी घेऊन जात आहे. ज्या अकाऊंट वरून हा व्हिडीओ पोस्ट केला गेलाय तिथे कॅप्शन देण्यात आलंय की ही झोमॅटोच्या मार्केटिंग हेडची कल्पना आहे. मध्य प्रदेश मध्ये झोमॅटोने ही कल्पना केल्याचं यात सांगण्यात आलंय. यासाठी त्यांनी खास एक मॉडेल जॉबवर ठेवलेली आहे. ही मॉडेल सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास झोमॅटोची रिकामी बॅग घेऊन रस्त्यावर फिरते. हे बघून लोकांना वाटतं की ही मुलगी झोमॅटोची डिलिव्हरी गर्ल आहे. कदाचित हे बघून लोक ऑर्डर सुद्धा करत असावेत असंही या पोस्ट मध्ये म्हटलंय.
Indore #Zomato marketing head had this idea. He hired a model to drive around with an empty zomato bag for one hour in the morning and one hour in the evening. @zomato is on a roll… 😁😁 pic.twitter.com/kuwVpNzewu
— Rajiv Mehta (@rajivmehta19) October 16, 2023
ही मुलगी इतकी सुंदर आहे की रस्त्याने जाताना लोक तिला वळून वळून बघतायत. झोमॅटोचे आजवर तुम्ही डिलिव्हरी बॉय बघत आलाय पण आज तुम्ही ही मुलगी बघाल. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. हेल्मेट न घालता एका बाईकवर एक मुलगी झोमॅटोची बॅग घेऊन फिरतीये. ती कुठेतरी जाताना दिसतेय. एक माणूस तर तिला काहीतरी विचारताना सुद्धा दिसतोय.