Zomato Swiggy Viral Video: झोमॅटोमधील (Zomato) एक स्विगी रायडर (Swiggy) यांचा एक खूप सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय. वास्तविक स्विगी आणि झोमॅटो यांच्यात स्पर्धा असते पण हा व्हिडीओ पाहून कळतं ही स्पर्धा काय यांच्या आड आलेली नाही कारण यांची मैत्रीच खूप सुंदर आहे. दिल्लीच्या कडक उन्हात उष्णतेत सायकल चालवत असलेल्या झोमॅटो डिलिव्हरी मॅनला (Delivery Man) स्विगी रायडरने कशाप्रकारे मदतीचा हात दिला हे ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओतल्या मैत्रीची लोकं प्रचंड चर्चा करतायत. मोटरसायकलवरून जात असलेल्या स्विगी डिलिव्हरी एजंटने आपला हात पुढे केला जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झोमॅटो रायडरला तो हात धरून पुढे जाता येईल. इन्स्टाग्राम युजर सना अरोराने फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर हे फुटेज शेअर करत लिहिले की, “दिल्लीतील या अत्यंत उष्ण आणि असह्य दिवसांमध्ये खरी मैत्री दिसून आली आहे!” तिने आपल्या पोस्टमध्ये फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटोला टॅग केले आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जवळपास दहा लाख व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्ससह व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने, यातल्या मैत्रीने प्रेक्षकांना स्पर्श केलाय. लोकं तर आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा खाली टॅग करतायत. त्यांनी स्विगी डिलिव्हरी एजंटचे कौतुक केले. एका व्यक्तीने लिहिले: “ब्रदर्स ब्रदर्स आहेत.” आणखी एक जण म्हणाला, “आज मी पाहिलेली सर्वात चांगली गोष्ट आहे. तिसऱ्याने म्हटले, “कामामुळे विभाजित होऊन माणुसकीने एकजूट झाली आहे.”
या वर्षाच्या सुरुवातीला, ट्विटर वापरकर्त्यांनी झोमॅटो डिलिव्हरी एजंटसाठी निधी गोळा करण्यासाठी एकत्र आले होते, ज्याला सायकलवर ऑर्डर देताना फोटो काढण्यात आला होता. झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते की, कंपनी सर्व ऑर्डरपैकी 20% सायकलवर देत आहे आणि दिल्लीसारख्या गर्दीच्या शहरांमध्ये ही संख्या 35% इतकी आहे. ते म्हणाले की, हे त्यांच्या दैनंदिन कार्बन फूटप्रिंटची भरपाई करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केले गेले आहे. परंतु या निर्णयावर टीका झाल्याशिवाय राहिली नाही, इंटरनेटच्या एका भागाने असा युक्तिवाद केला आहे की लोकांना कडक उन्हात सायकल चालविण्यास भाग पाडणे म्हणजे अनैतिक व्यवसाय पद्धती आहेत.