तुम्ही कधी मुंगीचा चेहरा कसा दिसतो पाहिलंय का? एका फोटोग्राफी स्पर्धेसाठी स्पर्धकाने मुंगीचा फोटो काढला. या फोटोग्राफला बक्षीस सुद्धा मिळालंय. पण तुम्ही जर हा मुंगीचा फोटो पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल. सगळ्यात आधी तर तुम्ही हा फोटो बघा. हा फोटो मुंगीच्या चेहऱ्याचा आहे. फोटो बघताना असं वाटतं हा कुठलातरी भयानक प्राणी आहे, मुंगी आहे असं वाटतंच नाही. हा फोटो खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे.
फोटोग्राफरने मुंगीचा असा फोटो काढला की खळबळ उडाली. हे चित्र इतकं भन्नाट आहे की फोटोग्राफरला पुरस्कार मिळालाय.
यंदाच्या निकॉन वर्ल्ड फोटोमाइक्रोग्राफी स्पर्धेसाठी हे फोटो मागविण्यात आले होते. यात लिथुआनियाचा वाइल्डलाइफ फोटोग्राफर यूजीनिजस कवलियाउस्कस च्या या फोटोने चमत्कार केला.
ant close up face
या स्पर्धेची एक अट अशी होती की छायाचित्रकारांना छोट्या विषयांचे मोठे आणि झूम फोटो काढावे लागत होते. ज्यात या मुंगीचा फोटो काढण्यात आलाय. हा फोटो बघताना एखाद्या चित्रपटात ग्राफिक्सचा वापर करून एक भितीदायक प्राणी दर्शविला गेलाय असं वाटतं.
या चित्राला अंतिम विजेता घोषित करण्यात आले. हे चित्र काढणारा यूजीनिजस कवलियाउस्कस याला पहिला पुरस्कार देण्यात आलाय.
विशेष म्हणजे मुंगीचा खरा चेहरा लोकांसमोर आल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. मुंगीचा चेहरा पाहून लोकांना हॉरर चित्रपटाची आठवण झालीये. इतकंच नाही तर लोकांना गेम ऑफ थ्रोन्सचा ड्रॅगन सुद्धा आठवलाय.